जिल्ह्यातील गौशाळेतून गोवंश विक्रीचा गोरखधंदा सुरूच ?

भंडारा पत्रिका / विशेष प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील चार गौशाळेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाया करून पोलिसांनी जप्त केलेले तब्बल २७ हजार गौवंश गौशाळा संचालकांनी परस्पर गौतस्करांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सदर गोवंश विक्री प्रकरणाची चौकशी राज्य समिती गठीत करून चौकशी अहवाल गुलदस्त्यात ठेवल्याने प्रशासकीय कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चौकशी अहवालानुसार ४ गौशाळें विरुद्ध कारवाई न झाल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. हे सगळं करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने गौशाळा संचालकांचे हौसले बुलंद असून पोलिसांनी जप्त केलेल्या गोवंश विक्रीचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू असल्याची माहिती आहे. मागील अनेक वर्षापान गोंदिया भंडारा चंद्रपूर-गडचिरोली नागपूर या जिल्ह्यात अवैध गोवंश तस्करीचे रॅकेट सक्रिय आहे या पाचही जिल्ह्यात गोवंश तस्करांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला हजारोच्या संख्येत गौवंश विशेष करून लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सड़क येथील सुकृत गौशाळा , निर्मल गौशाळा, रेंगेपार कोहळी येथील मातोश्री गौशाळा, बाम्हणी येथील मॉ गौशाळेमध्ये स्वाधीन करण्यात आला.

मात्र येथील गौशाळा संचालकांनी तब्बल २७ हजार गौवंश गौशाळा संचालकांनी परस्पर गौतस्करांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याची चौकशी राज्य समिती च्या माध्यमातून करण्यात आली होती मात्र चौकशी अहवालानुसार सदर गौशाळा संचालकांवर कारवाई न झाल्याने चौकशीवर संशय निर्माण करण्यात येत आहे. अ‍ॅनिमल वेल्फेअर लॉ इन महाराष्ट्र’च्या सदस्यांनी संबंधित प्रकरणाची तक्रार शासनाला केली होती शासनाने या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तक्रारीत गोधनाचा अद्यावत रेकॉर्ड न ठेवणे, बोगस मृत्यूचे दाखले जोडणे, चारापाण्याची अपुरी सोय क्षमतेपेक्षा जास्त गोवंश प्राप्त केल्याचे संशयित प्रश्न उघडकीस आले होते. लाखनी तालुक्यातील या चार गौशाळा संचालकांचे पोलिसांशी हितसंबंध असल्याने गौतस्कराचां पोलिसांनी जप्त केलेला गोवंश संगनमत करून आपल्या गौशाळेला गोवंश मिळविण्यासाठी मोठ्या रकमेचे पोलिसांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न करतात. उल्लेखनीय आहे की भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांशी या चारहीगौशाळा संचालकांचे आर्थिक हितसंबंध असून ज्या गौशाळा संचालका सोबत पोलिसांचा सौदा पटला त्या गौशाळेला पोलीस जप्त केलेले गोवंश सुपूर्द करतात. हा गोरखधंदा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.

या गोरख धंद्यावर आळा घालण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व थानेदारांना पत्र काढून आदेश दिले होते गोवंश तस्करी प्रकरणात जप्त केलेले जनावरे चारही गौशाळांना देण्यात येऊ नये. तरी भंडारा व अन्य जिल्ह्यातील झालेल्या कारवायामध्ये जप्त केलेली जनावरे सदर गौशाळेत देण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये सकृत व अन्नपूर्णा गौशाळेत सर्वाधिक गैरव्यवहार झाल्याच्या नोंदी अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. नुकत्याच मागील महिन्यात गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात झालेल्या कारवाईतील गोवंश पिंपळगाव येथील सकृत गौशाळे ऐवजी अन्नपूर्णा गौशाळेत आल्याची माहिती आहे. सकृत गौशाळा ची चौकशी सुरू असल्याने त्याच ठिकाणी तातडीने अन्नपूर्णा नावाने गौशाळा उघडण्यात आली. कारण गौशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक स्त्रोत निर्माण होत असल्याने हा गोरख धंदा सुरूच आहे. या सर्व प्रकरणी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सदरचारही गौशाळा संचालकांवर जप्त केलेली गोवंश अवैधरित्या विक्री केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैशाची वसुली करून शासन जमा करावे अशी मागणी अ‍ॅनिमल वेल्फेअर लॉ इन महाराष्ट्र चे सदस्य राजू गुप्ता यांनी केली होती.

जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई च्या सपाटा सुरू केलेला आहे. सोशल मीडियावर स्वत: पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आव्हान करून अवैध व्यवसायाच्या विरुद्ध माहिती देण्यासंबंधी ची पोस्ट केली आहे. पोलीस प्रशासनाला अ‍ॅक्टिव्ह मोडवर आणून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात त्यांच्या विश्वासातल्या अधिकाºयांकडून मोठ्या कारवाया जिल्ह्यात होत असल्याने अवैध व्यवसायिकात धास्ती भरली आहे. अवैध गोवंश तस्करी ,रेती वाहतूक, गांजा तस्करी सट्टा जुगार बेकायदा दारू व अनेक अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात येत आहे. अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करून जप्त केलेली गोवंश जिल्ह्यातील गौशाळांमध्ये देण्यात येत आहे ती गोवंश सुरक्षित आहेत किंवा नाही हा मात्र प्रश्नच आहे. इतके होत असताना सुद्धा मुजोर व अधिकाºयांशी मधुर संबंध असलेल्या गौतस्कराचीं तस्करी बिनधास्त सुरू असल्याची चर्चा आहे. पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेली मोहीम नागरिकांच्या मनात कौतुकास्पद असून तशा चर्चा जिल्यातील नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. मात्र विभागातील अधिकारी व कर्मचाºयांमधील मॅनेज प्रवृत्तीची मानसिकता बदलण्याची गरज असून विभागातील अशांचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यावरच अवैध व्यवसायांवर आळा घालण्यात यश मिळेल असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *