राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठविले रक्ताने लिहिलेले पत्र

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आपल्या नेत्याला हमी देण्यासाठी अजय मेश्राम या कार्यकर्त्याने चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. रक्ताच्या नात्यातील लोक सोडून गेल्याने अशांना प्रत्युत्तर देण्यासाठी भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अजय मेश्राम यांनी स्वत:च्या रक्तानेच आपली पक्षनिष्ठा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपल्या रक्ताच्या नात्यातील लोक स्वार्थासाठी आपल्याला सोडून गेले. मात्र आपण घाबरू नका. आम्ही आपल्या सोबत आहोत’, असा मजकूर असलेले हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्याने खासदार शरद पवार यांना पाठविले आहे. अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. पक्षातील काही नेते अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडले आहेत, तर काही अद्यापही शरद पवार यांच्यासोबत आहेत. अशात भंडारा येथील अजय मेश्राम या कार्यकर्त्याने आपल्या ‘साहेबांना’ ही भावनिक साद घातली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *