अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांचे स्थानांतरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांचे स्थानांतरण झाले असून त्यांच्या जागेवर ईश्वर कातकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पवनीच्या उपविभागीय अधिकारी रिना जनबंधू यांची पदोन्नती झाली असून त्यांचेही चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील २३ पोलिस अधिकाºयांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये भंडारा येथील अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून ईश्वर कातकडे यांची नियुक्ती करण्यात आली तर पवनी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांना चंद्रपूर जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच राज्यातील तीन अप्पर पोलिस अधीक्षकांचे स्थानांतरणही करण्यात आले आहे. यामध्ये भंडारा येथील अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांचा समावेश आहे. अद्याप त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण निश्चित करण्यात आले नसून पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र्यरित्या काढण्यात येणार असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *