अत्याचाराच्या आरोपीला दहा वर्षाचा कारावास

भंडारा : तरुणीवर अत्याचार करणाºया आरोपीला भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षाचा सश्रम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. रुपचंद दिलीप शेंडे (२५) रा. कस्तुरबा गांधी वार्ड, भंडारा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रुपचंद शेंडे यांने ४ वर्षापुर्वी फिर्यादी मुलीची वाट अडवून तिचा मोबाईल नंबर घेतला.यानंतर वारंवार फोन करून त्रास देणे सुरू केले. दरम्यान मुलीची आई घरी नसताना रुपचंदने लपून येत मुलीवर अतिप्रसंग केला. हा प्रकार वारंवारसंधी साधून केल्याने मुलीचा आईच्या लक्षात आले. त्यामुळे पिडीत मुलीच्या आईने भंडारा पोलिस स्टेशन गाठून रुपचंद शेंडे यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३७६ (२), २३७ (३) व पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून रुपचंदला अटक केली. याप्रकरणी आरोपीविरूध्द सबळ पुरावे गोळा करून प्रकरण भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ठ करण्यात आले. सदर गुन्ह्याची सुनावणी न्यायाधीस अंजू शेंडे यांच्या न्यायालयात चालली. त्यांनी सर्व साक्ष पुराव्यांच्या आधारे आरोपी रुपचंद शेंडे याच्याविरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने तिन्ही कलमान्वय प्रत्येकी १० वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास दोन महिने आणखी कारावास भोगावा लागणार आहे. सरकारी पक्षातर्फे अभियक्ता दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *