ब्राम्हणवाद व भांडवलशाहीच्या प्रचारातून बाहेर पडले पाहिजे – माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी जवाहरनगर : जर तुम्ही सगळ्यांनी मनात आणले तर, या देशात क्रांती घडवून आणायची असेल तर ती क्रांती आंबेडकर वादी जमातच करेल.आंबेडकर वादी जमात अजूनही सूज्ञ आहे, तुमच्या सारखेच पैसा कमवायला लागले आहेत. खालचा समाज अजूनही बाबासाहेबांच्या तत्वांना पकडुन आहे, त्यांना माहीत आहे आपला सत्रू कोण आहे. तुम्ही सत्रुंचा मुका घ्यायला लागले आहोत, सत्याचा उलगळा करणार नाही आम्ही शिकलेले लोक आहोत ते स्वार्थी आहेत लाचार आहात व्यवस्थेने ते ओळखले आहे. त्यांनी तुम्हाला असे बनविले की, तुम्ही गाव विसरून गेले आहात. ब्राम्हणवाद व भांडवलशाहीचा प्रचार केला गेला आहे. या सर्व प्रचारामधून तुम्हाला बाहेर पडले पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक कार्यक्रमात केले. भारतीय संविधान दिन कार्यक्रम आयुध निर्माणी जवाहरनगर, भंडारा येथील मल्टीपरपज बहुउद्देशिय सभागृह येथे दोन दिवसीय कार्यक्रमातील पहिल्या दिवसीय उद्घाटकिय कार्यक्रमांत मुख्य वक्ता म्हणून कोळसे पाटील बोलत होते.

व्यासपीठावर आयुध निर्माणी जवाहरनगर, भंडारा चे महाप्रबंधक सुनिल सप्रे, समता सैनिक दल महाराष्ट्र बौद्धिक प्रमुख भास्कर कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे तैलचित्राचे पूजन व भारताचे संविधान प्रस्ताविकतेचे वाचन करण्यात आले. आयुध निर्माणी जवाहरनगर, भंडारा चे महाप्रबंधक सुनिल सप्रे, यांनी प्रास्तविक भाषणात भारताचे एक सार्वभौम, समतावादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही,गणराज्य घडविण्याच्या व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास श्रध्दा व उपसना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता हे संविधानाची आत्मा आहे असे विचार मांडले, तर समता सैनिक दल महाराष्ट्र बौद्धिक प्रमुख भास्कर कांबळे यांनी सध्या भारतीय राजकारण व भारतीय संविधान यावर आपले मत नोंदविले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जावळेकर तर प्रास्ताविक अमोल मेश्राम यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *