वरठी पोलीसांनी केली २५ जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वरठी पोलीसांनी ग्राम दाभा परिसरात अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाठया ट्रकवर कारवाई करीत २५ जनावरांची सुटका करीत ८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.तसेच पाच आरोपीविरोधात वरठी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशांत मेश्राम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी वरठी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून ग्राम दाभा मोडवर ट्रक क्र. एमच ४०/एन-६९२१ ला अडवुन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीचे २५ लाल, पांढºया,काळया, लाल रंगाचे बैल, गोठहे कोंबुन त्यांची निर्दयतने वाहतुक करण्यात येत असल्याचे दिसुन आले.

पोलीसांनी किंमती १ लाख ६०हजार रुपए ेिकंमतीची २५ जनावरे व ७ लाख रुपए किंमतीचा ट्रक असा एकुण ८ लाख ६० हजार रुपये विंष्ठमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जनावरांची वाहतुक करणारे अनिल रामदास पातोडे, वय ३८ वर्षे रा. प्लॉट नं. ३/बी महेंद्र नगर डा. आंबेडकर मार्ग नागपुर , ट्रक क्लिनर महेषकुमारमोतालाल बिजेवार, वय ३० वर्षे रा. चंगेरा ता. जि. गोंदिया , लक्ष्मीकांत सुखराम नेवारे, वय २६ वर्षे रा. राममंदीर, झालुटोला पो. दवनिवाडा ता. जि. गोंदिया , सादीक हियायत खान वय अंदाजे ४० वर्षे रा. चंगेरा ता. जि. गोंदिया, व मो. शरिफ कुरेशी वय अंदाजे ४० वर्षे रा. चिराग अली चैक, नवनि वस्ती, टेकानाका नागुपर या पाच आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन वरठी येथे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर जनावरे भागीरथा गौ अनुसंधान बहुउद्देंषीय संस्था मालीपार चांदोरी येथे पाठविण्यात आली. सदर कार्यवाही .पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे मार्गदर्शनात वरठी पो.स्टे. पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, पोलीस हवालदार गोमासे यांनी केली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *