न.प. क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना निधी वाटप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : केंद्र शासनाच्या नि:समर्थ (दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम,२०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी दरवर्षी ५% निधी राखीव ठेवण्यात येतो. यावर्षी नगर परिषद साकोली क्षेत्रातील १९९ दिव्यांग व्यक्तींना २७ सप्टेंबर ला नगरपरिषद मार्फत ३,४१,८८२ रुपये निधी वाटप करण्यात आला.निधी वाटप कार्यक्रम न.प.सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता पारित पडला.याकरिता क्षेत्रातील सर्व दिव्यांग व्यक्ती कार्यक्रमाला हजर होते. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत होणाºया या कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना मुख्याधिकारी डॉ.रामटेके व नगर अभियंता श्री यवतकार यांचेमार्फत धनादेश वाटप करण्यात आले व पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त रक्कम वाटप करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशासकीय अधिकारी स्वप्नील हमाने यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रदर्शन शुभम द्रुगकर, अभियंता यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *