पर्यावरणस्नेही होळी उपक्रमाला मार्गदर्शन करतांना- प्रा. रामकृष्ण हारगुडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : कृष्णमूरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय हरित सेना ‘जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब’ तर्फे मागील १४ वर्षांपासून पर्यावरणस्नेही होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा शालेय गार्डन मध्ये प्राचार्य रामकृष्ण हारगुडे यांचे अध्यक्षतेखाली व पुष्पा बोरकर, विज्ञान शिक्षक बी एस लंजे, प्रा.जागेश्वर तिडके, शिवदास लांजेवार, प्रा.शीतल साहू यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना ‘जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब’चे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी होळीनिमित्त जंगलसंपत्तीचे व रासायनिक रंगाने कसे नुकसान पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे हे सोदाहरण पटवून दिले. अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य रामकृष्ण हारगुडे यांनी पर्यावरण होळीनिमित्तचा संदेश समाजातील विध्वंसक वृत्ती पर्यंत पोहचवून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन नेचर क्लब सदस्यांना केले. त्यानंतर प्राचार्य व सर्व उपस्थित प्रमुखशिक्षकांनी विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेले नैसर्गिक कोरडे व ओले रंगाचे निरीक्षण करीत त्यांच्या रंग सादरीकरणाचे कौतुक केले. यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनो शालेय परिसर व गार्डन स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. त्यानंतर जमा झालेल्या केरकचराचे वृक्षपूजन करून व विधिवत पूजा करून प्राचार्यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले.
नैसर्गिक ओले रंग बनवा स्पर्धेत मिडलस्कुल विभागात प्रथम क्रमांक नंदिनी करंजेकर हिला तर द्वितीय क्रमांक वैदेही दोनोडेला तर तृतीय क्रमांक अभिज्ञान वाघमारे याला प्राप्त झाले. कोरडे रंग बनवा स्पर्धेत जान्हवी शेंडेला प्रथम क्रमांक तर अभिज्ञान वाघमारे ला द्वितीय क्रमांक तर अथर्व बहेकार ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. हायस्कूल गटात ओले व कोरडे रंग बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा बहेकार हिला तर रुणाली निंबेकर ला द्वितीय क्रमांक तर रोहिणी भैसारे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. ज्युनिअर गटात टिकेश्वरी हरणे हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक वैभवी कटनकर, सानिया रामटेके, नैतिक बनकर, पूर्वा देशमुख, कोमल भांडारकर, निधी निखारे, धनश्री मेश्राम, गुंजन घरत, समृद्धी खेडीकर, धनश्री कापगते, पूजा अग्रवाल,ऋतुजा गहाने, वृषाली चुटे यांना देण्यात आला. होळी फलक लेखन स्पर्धेकरिता पूर्वा बहेकार यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. नैसर्गिक रंग परीक्षण पुष्पा बोरकर मॅडम, सर्पमित्र युवराज बोबडे, गोविंदा धुर्वे, रोशन बागडे, तसेच प्राचार्य रामकृष्ण हारगुडे यांनी केले.
स्वच्छता अभियान राबवून केरकचरा जमा करणारे स्वयंसेवक ऋतुजा गहाने, पूजा अग्रवाल, धनश्री कापगते, समृद्धी खेडीकर, शर्वरी खोब्रागडे, तन्मय जांभुळकर, तेजस जांभुळकर, हिमांशू बनकर, नमन सोनवाने, पूर्वा बहेकार, सोनम शेंडे, टिकेश्वरी हरणे यांचे विशेष कौतुक प्राचार्यांनी टाळ्यांचा गजरात केले. कार्यक्रमाचे संचालन टिकेश्वरी हरणे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संस्थाअध्यक्ष विद्या कटकवार, प्राचार्य रामकृष्ण हारगुडे, पुष्पा बोरकर, के.पी बिसेन, पूर्वा बहेकार, रुणाली निंबेकर, रोहिणी भैसारे, अथर्व बहेकार, चेतन बनकर, टिकेश्वरी हरणे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.