कामाई करंजेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एकोडी येथे शिक्षक दिन साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : कामाई करंजेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एकोडी येथे शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये मुख्याध्यापिका म्हणून वर्ग बाराची विद्यार्थिनी कु. रवीना रामेश्वर लेंडे हिने मुख्याध्यापिकेचा पदभार सांभाळला. विद्यार्थ्यांनीच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची भूमिका निभावली. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एन. सी. पटले यांचा आदर्श शिक्षक म्हणून विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. त्यानिमित्ताने भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करताना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम गीत, मनोगत याप्रसंगी घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. आशा बोरकर यांनी आपल्या भाषणांमधून अज्ञानाच्या अंध:कारातून प्रकाशाकडे नेणाºया सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्या विनम्र व प्रामाणिकपणे करावी असे सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून एस. एन. आगाशे, एन. सी. पटले, एस. बी. राखडे, बी. एम. राठोड, एन. आर. कापगते, एस.एस. सुरकर, एस.एम. कापगते, के. एम. हूमणे, डी.डी. करंबे, सौ. पी. सी. खोब्रागडे, कु. डी. डी. पटले, जे. एन धांडे, एल गणवीर, वाय बी वरखडे, एस एन लांजेवार, अजय मोहुर्ले, कुमारी साक्षी हेडाऊ या कार्यक्रमात उपस्थित होते. शिक्षक दिनाचा कार्यक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या सहकार्यातून पार पडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *