प्रगती महिला महाविद्यालय शिक्षक दिन साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक प्रगती महिला कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे उपस्थित होते. यांनी याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन, शिक्षकांनी आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडावीत असे आवाहन केले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. आरती कश्यप, भावना मांदाडे, पायल कापगते, निकिता नागदेवे, सायली कुकडे, केसर बावने यांनी शिक्षकांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. क्रिष्णा पासवान यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. जयश्री सातोकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गजानन कळंबे, डॉ. शालिक प्राठोड, प्रा. दुर्गाप्रसाद चौधरी, डॉ. ज्ञानेश्वर हिवसे, प्रा. ठाकरे, संजय वानखेडे यांचे सहकार्य लाभले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *