सर्वपल्ली राधाकृष्ण जन्मदिनानिमित्त नगर परिषद भंडारातर्फे आदर्श शिक्षक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दि. ०५ सप्टेंबर २०२२ रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त नगर परिषद भंडाराच्या वतीने आदर्श शिक्षक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिनाचे औचीत्य साधून नगर परिषदेच्या असलेल्या शाळा नगर परिषद गांधी विद्यालय, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल, डॉ. झाकीर हुसैन उर्दू प्राथमिक शाळा नगर परिषद भंडारा व शहीद भगत सिंग वरिष्ट प्राथमिक शाळा नगर परिषद भंडारा येथे कार्यरत असलेल्या शिक्षकातील, आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता नगर परिषद भंडाराचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विनोद जाधव हे प्रमुख अतिथी व नगर परिषद भंडाराच्या लेखाअधिकारी श्रीमती कनसारे यांनी अतिथी म्हणून आपली उपस्थिती दर्शविली.

प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्ण, ए. पी. जे. अब्दुल कलाम व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत दिप प्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर उपस्थित असलेल्या सन्मान मूर्ती म्हणजेच शिक्षकवृंदाना प्रमुख अतिथी विनोद जाधव साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर नगर परिषद गांधी शाळेचे मुख्याध्यापक नागोसे सरांनी उपस्थिताना शिक्षक दिन तसेच सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत शिक्षक म्हणून काम करत असतानाच्या आपल्या गोडकडू आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी विनोद जाधव साहेबांनी उपस्थित शिक्ष्- ाकवृंद व नगर परिषद कर्मचाºयांसोबत संवाद सादत प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे असणारे महत्व व एक शिक्षक आपल्या जीवनाला कसा आकार देतो या बद्दल भाष्य करत सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती प्रणाली नागूलवार, सहाय्यक शिक्षिका शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा नगर परिषद भंडारा यांनी तर नगर परिषद भंडारा च्या लेखा अधिकारी श्रीमती रसिका लांजेवार यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *