गाफील राहु नका डेंग्यू व चिकुनगुनिया पासुन सावध रहा : डॉ. नितीन वानखेडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सध्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी जास्तपणामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढू शकतात. सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू यासारख्या आजारांची नागरिकांना लागण होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्याच्या दिवसात चिकनगुनिया व डेंग्यु होण्याची देखील शक्यता असते. डेंग्यू, चिकुनगुनिया हे आजार डासामुळे होत असतात. चिकनगुनिया व डेंग्यु हा एडिस इजिप्टाय या डासामुळे पसरणारा आजार आहे. डेंगू, चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीस चावला तर आजारी रुग्णाच्या रक्तातील विषाणू त्या डासाच्या रक्तात शिरतात त्यानंतर आणि व्यक्तीला तोच डास चावल्यास ते विषाणु आधी व्यक्तीच्या शरीरात सोडतो त्यातून निरोगी माणसाला डेंग्यू ताप व चिकुनगुनियाचा होण्याची शक्यता जास्त असते. या रोगाचा प्रसार थांबण्यासाठी एडीस डासाच्या उत्पतीवर आळा घालणे गरजेचे आहे.

अँनाफिलीस अस्वच्छ पाण्यावर तर एडीस डासाची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते या अंड्यातून बाहेर पडणाºया डासांच्या अळ्या वाढतात. त्या चार ते पाच दिवसानंतर या अळ्याचे कोष बनतात हे कोष ही पाण्यातच जिवंत राहतात. कोषातून दोन ते तीन दिवसांनी डास बाहेर येतात. पावसाळ्यात चिकनगुनिया, डेंग्यू व हिवताप हे आजार वाढतात. त्यामुळे घरात व आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही लक्षणे दिसल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रक्ताची तपासणी करूनघेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस (शनिवार) कोरडा दिवस म्हणून पाळणे त्या दिवशी घरातील सर्व पाणी साठे कोरडे करून स्वच्छ करावे व कपड्याने पुसून घेण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी केले आहे. सर्दी, खोकला, थंडी ताप, डेंग्यू, यासारख्या आजाराची नागरिकांना लागण होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्याच्या दिवसात चिकनगुनिया व डेंग्यू होण्याची देखील शक्यता असते. डेंग्यू, चिकुनगुनिया हे आजार डासामुळे होत असतात. चिकनगुनिया व डेंग्यू हा एडिस इजिप्टाय या डासामुळे पसरणारा आजार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.