वैनगंगेवरील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार

प्रतिनिधी तुमसर : मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावरील माडगी शिवारात वैनगंगा नदीपात्रातील शंभर वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन दगडी रेल्वे पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील चक्की ब्रीज वाहून गेल्याने रेल्वे प्रशासनाने देशातील १० वर्षे व त्यापुढील सर्व रेल्वे पुलांचे आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात मुंबई-हावडा रेल्वे मार्गाची निर्मिती ब्रिटिशांनी सर्वात प्रथम केली होती. या मार्गावर माडगी शिवारात वैनगंगा नदीपात्रात ब्रिटिशांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी दगडी पुलाचे बांधकाम रेल्वे वाहतुकीसाठी केले होते. आजही हा पूल सुस्थितीत आहे. दगड व चुनखडी मिश्रणाने या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते.

या पुलाला अजून कुठेही तडे गेले नाहीत. स्थापत्य कलेचा तो उत्कृष्ट नमुना मानला जातो. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील माडगी येथील वैनगंगेच्या नदीपात्रातील रेल्वे पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेतला आहे. येथे नदीपात्र हे विस्तीर्ण आहे. आतापर्यंत या पुला खालून अनेक पूर वाहून गेले. त्यामुळे दक्षता घेत रेल्वे प्रशासनाने १० वर्षे व त्या पुढील जुन्या रेल्वे पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची माहिती आहे. तज्ज्ञ स्थापत्य अभियंत्यांचे पथक तपासणी करणार आहेत. वैनगंगा नदीवर माडगी येथे दगडी पुलावर लोखंडी स्ट्रक्चर ठेवण्यात आले आहेत. दोन पिल्लरमधील अंतर ४५.७२ मीटर इतके असून येथे पिल्लर आहेत. या पुलाची लांबी ४११.४८ मीटर आहे. ब्रिटिशांनी पुलाचा पाया अतिशय भक्कम केला असून पूर्ण जितका घर दिसतो तितकेच ते जमिनीखाली असल्याचे सांगितले जाते. सध्या या रेल्वे मार्गावर २४ तासात सुमारे १८० ते २१० मालवाहतूक गाड्या व प्रवासी गाड्या धावतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *