‘हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ भंडारा

पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : मुख्यमंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, महामंडळ यांच्या हस्ते ‘हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून या पार्श्वभुमीवर लाखनी येथील बसस्थानकात याची सुरुवात करण्यात येणा आहे. सदर अभियानाचा कालावधी १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत आहे. या अभियानासाठी रा.प. महामंडळामध्ये मध्यवर्ती व विभागीय स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. अभियाना अंतर्गत रा.प. महामंडळाच्या बसस्थानकांचे भौगोलिक स्थान, प्रवाश्यांची चढउतार, बस फेºयांची संख्या या निकषाच्या आधारे बसस्थानकांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करण्यात आले आहे.

अभियाना अंतर्गत बसस्थानकांचे कालबद्ध मुल्यांकन करुन व त्या आधारे गुण देवुन बसस्थानकांची पारितोषिकासाठी शिफारस करण्याकरीता विभाग स्तरावर समित्या नेमण्यात आल्या आहेत. सदर समित्या दर दोन महिन्यांनी मुल्यांकन अहवाल सादर करतील. विभाग नियंत्रक, श्रीमती तनुजा अ. अहोरकर यांचे अध्यक्षतेखाली विभागीय अभियंता, उपयंत्र अभियंता, कामगार अधिकारी, जेष्ठ पत्रकार व प्रवाशी संघटनेचे प्रतिनीधी यांची समिती नेमण्यात आलेली आहे. सदर समिती मध्यवर्ती कार्यालयाचे समितीने ठरवुन दिलेल्या विभागाची तपाषणी करुन अहवाल सादर करणार आहे. ज्या बसस्थानकाला ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त होतील त्या बसस्थानकांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार आहे.

अभियानाच्या पुर्व तयारी करीता विभाग नियंत्रक यांनी बैठकिचे आयोजन करुन अभियानाची संकल्पना रा.प.अधिकारी व कर्मचारी यांना समजावुन सांगीतली आहे. आपला गाव आपले बसस्थानक या संकल्पनेवर आधारीत लोक सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. रा.प. विभागिय स्तरावरील अधिकाºयांची भंडारा विभागातील सहाही आगाराकरीता पालक अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. हे अधिकारी बसस्थानक स्वच्छतेबाबत तपासणी करणार आहेत. या अभियाना अंतर्गत बसस्थानकाची स्वच्छता, बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची स्वच्छता, प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, बसस्थानके व रा.प. कर्मचरी विश्रांतीगृहे तसेच बनस्थानकांच्या सुशोभिकरणावर भर देण्यात येणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *