जिल्ह्यातील पीओपी मुर्तिकारावर कार्यवाही करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अड्याळ / चिचाळ :- पीओपी मूर्ती तयार करणे व विक्री बंदीचे आदेश असताना शासन प्रशासनाला वारंवार निवेदने देवूनही दुर्लक्ष करीत असल्याने माती मूर्तिकार संघटनेने जिल्हाधिकारी, प्रदूषण विभाग भंडारा, जिल्हा पोलीस अधीक्षक,पोलीस निरीक्षक भंडारा यांना निवेदन देऊन आठ दिवसात कार्यवाही न केल्यास मातीमुतीर्कार जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मातीमुतीर्कार संघटना भंडारा यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने पी.ओ. पी. संदर्भात १२ मे २०२० रोजी जारी मार्गदर्शक तत्वानुसार देवी-देवतांच्या पी.ओ.पी. मुतीर्ची पुजेकरीता विक्री करता येत नाही. राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाने ही या संदर्भात आदेश दिला असुनही शासनाना मातीमुतीर्कार संघटना भंडारा च्या वतीनी जिल्हाधिकारी, प्रदूषण विभाग भंडारा, जिल्ह्यातील पवनी,भंडारा, तुमसर नगर परिषदेला वारंवार निवेदने देवूनही ते काम आमचे नाही तुम्ही यांना भेटा त्यांना भेटा त्या विभागात जा असे म्हणून दोन महिन्यापासून गुमराह करीत असल्याने संत्पत माती मुर्तिकार संघटनेने शासनाला निवेदन देवून जिल्ह्यातून पीओपी हद्दपार करावी पवनी तालूक्यातील कोंढा येथील पीओपी कारखाण्यावर धाड टाकूण जप्तीची कारवाई करावी.

मातीमुर्ती कलावंताना शासनाकडून लोककलावंता प्रमाणे रु.३०००/- मानधनदेण्यात यावे, माती मुतीर्कार व पेंटरांना पेंटींग किट देण्यात यावी,डिजीटल μलेक्स पॅनरमुळे पेंटर निकामे झाल्यामुळे पेंटर बांधवांना शासकिय जनजागृती भिंती फलकाची कामे देण्यात यावी, प्राचीन काळात पेंटींगच्या माध्यमातून भिंती पत्रके रंगविणा-या पेंटर कलावंताना एस.टी. पासची सवलत देण्यात यावी,पी.ओ.पी. हे पाण्यात विरघडत नसल्यामुळे ते पर्यावरणाला घातक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणा-या अधिक-यांवर कारवाई करण्यात यावी.

सदर मागण्याचे आठ दिवसात पूर्तता न केल्यास माती मुर्तिकार संघटना भंडारा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा माती मुर्तिकार जिल्हा संघटना अध्यक्ष प्रकाश हातेल,सुनिल बुरबाडे,सुर्यभान वरवाडे, उपाध्यक्ष श्रीधर सावजकर, सचिव देवदास हटवार,लंकेश्वर कांबळे, प्रशांत शहारे जीवन शिवनकर, लिलाधर तेलमासरे, प्रवीण देशमुख, लक्ष्मी नारायण लिल्लारे,मधु जांभुळकर, डाकराम भुरे, जोशीराम नंदरधने,गोपाल भिसे , संघम सुखदेवे आदी पेंटर बांधव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *