तुमसर तालुका काँग्रेस पक्षाची जनसंवाद पदयात्रेची सुरुवात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : रायपूर छत्तीसगढ येथे मागील दिवसात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते कश्मीरच्या यात्रे प्रमाणे संपूर्ण भारतामध्ये तालुके निहाय यात्रा घेण्याचे ठराव घेण्यात आले होते. त्याच्याच भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रत्येक तालुका निहाय जनसंवाद पदयात्रा ची सुरुवात आज दिनांक ३ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होत आहे. तुमसर तालुक्यामध्ये सुद्धा दिनांक ३ सप्टेंबर पासून ही पदयात्रा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मागील पंधरा दिवसापासून तुमसर तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमात नियोजनासाठी काम करत आहेत. पदयात्रा दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोज रविवारला तुमसर तालुक्यातील हनुमान देवस्थान चांदपुर येथून सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवसाची पदयात्रा सकाळी ७ वाजता पासून सुरू होऊन सकाळी ११ वाजता पर्यंत अंदाजे दहा किलोमीटर चालली आहे. त्यानंतर ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मुक्कामी गावातील लोकांसोबत संवाद साधण्यात आला. एक छोटेखानी सभा घेण्यात येणार आहे.

गावातील विविध संघटना बचत गट, मंडळ यांच्यासोबत भेटीगाठी करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, त्यांची भावना सर्व काँग्रेसचे पदाधिकारी एकूण घेणार आहेत. त्यानंतर जेवण, विश्रांती व दुपारी तीन वाजता पासून अंदाजे दहा किलोमीटरची परत पदयात्रा होणार आहे व त्यानंतर त्या गावात मुक्काम करून छोटी सभा व विविध मंडळ बचत गट व विविध सामाजिक संघटनांसी भेटून लोकांसोबत चर्चा करून संवाद साधण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जेवण करून मुक्काम करण्यात येणार आहे. परत दुसºया दिवशी प्रार्थना करून समोरची पदयात्रा सुरू होणार आहे. दिनांक ३, ४, ५ सप्टेंबरला ही यात्रा निरंतर चालणार असून ५ व ६ सप्टेंबरला जन्माष्टमी निमित्त सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर दिनांक ८ सप्टेंबर पासून परत पदयात्रा सुरू होणार आहे. १३ तारखेपर्यंत निरंतर ही पदयात्रा चालत राहणार असून तुमसर येथे या पदयात्रेच्या समापन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या सोबत तुमसर शहर येथे पदयात्रा करून याचा समापन सभेमध्ये रूपांतर होऊन होणार आहे.

तुमसर तालुक्यातील पदयात्रा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्यात नियोजन समिती, भोजन समिती, मीडिया समिती, बॅनर समिती व अशा विविध प्रकारच्या समित्या नेमणूक करून विविध काँग्रेस पदाधिकाºयांना व कार्यकर्त्यांना जिम्मेदारी देण्यात आली आहे. तुमसर तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे या कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले असून तुमसर तालुक्यातील लोकांना या पद यात्रेच्या माध्यमातून एक संदेश द्यायचे आहे की, आता काँग्रेस सुद्धा तुमसर तालुक्यांमध्ये ताकतीने काम करणार आहे व येणाºया दिवसांमध्ये तुमसर तालुक्यात काँग्रेस भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

या पदयात्रेत तुमसर तालुका व शहर काँग्रेस कमिटी समवेत युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी सेल, अनुसूचित जाती सेल अनुसूचित जमाती सेल, पर्यावरण सेल, सांस्कृतिक सेल, तुमसर तालुका जनसंवाद पदयात्रेचे संयोजक अमरनाथ रगडे, समिती सदस्य प्रमोद तितीरमारे, जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य कृष्णकांत बघेल, अरविंद कारेमोरे, कलाम शेख, बाळा ठाकूर, उमेश्वर कटरे, जय डोंगरे, कान्हा बावनकर, शैलेश पडोळे, सीमा भुरे, पं. स. सदस्य कांचन कटरे, नरेंद्र गेडाम, शंकर राऊत, कैलास बहिरे, राजेश पारधी, सुरेश मेश्राम, अशोक उईके, रुद्रसेन भजनकर, प्रफुल बिसेन, कुसुम कांबळे, करुणा धुर्वे, उमेश पटले, प्रफुल गायधने प्रमोद कटरे, नरेश कुंभलकर, सर्कल प्रमुख अजय खंगार, आनंद सिंगनजुळे, नीरज गौर, बबलू शेख, तारेंद्र डिंकवार, चेनलाल मसरके, गणेश सोनूसार, निलेश अहिरे, मुन्ना कांबळे व तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांचे सहकार्य राहणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.