शहरातील सिसिटीव्ही कॅमेरे सुरू करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्याकरीता शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले परंतु सध्या स्थितीत बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ कार्यान्वीत करण्यात यावे अशी मागणी विकास फाऊंडेशन तुमसर शहराचे अध्यक्ष मेहताबसिंग ठाकुर यांच्या नेतृत्वात न.प.मुख्याधिकारी तसेच तुमसर ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. शहरात नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले मात्र सध्या स्थितीत ते कॅमेरे बंद अवस्थेत आहेत.शहरात घडणाºया गुन्हयांमध्ये आरोपींची ओळख पटविण्याकरीता तसेच त्यांना जेरबंदकरण्याकरीता सिसिटीव्ही कॅर्मेयाची मोठी मदत होत असते त्यादृष्टीकोणातुन शहरातील बंद अवस्थेत असलेले सिसिटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणीनिवेदनातुन करण्यात आली. निवेदन देतांना विकास फाउंडेशन तुमसर शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर , माजी नगरसेवक राजू गायधने ,अनिलभाऊ जिभकाटे ,शेखर बिसेन , ललित शुक्ला , अजय बडवाईक ,गौरव नवरखेळे ,प्रवीण काहलकर ,अश्विन ठाकूर, किशोर माटे ,रीना ताई माटे ,अनिल हटवार, सुलभाताई हटवार , नावेद शेख राकेश बडवाईक, हेमंत मलेवार, आशिष गजभिये तसेच विकास फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *