जंगल व्याप्त गौशाळेमुळे वन्य प्राण्यांना लंपीचा धोका !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : जिल्ह्यातील अनेक गौशाळा या जंगलव्याप्त क्षेत्रात असून त्यामध्ये अवैध वाहतूकीतून गोवंश तस्करीतील पोलिसांनी जप्त केलेली गोवंश या गौशाळेमध्ये पालन पोषण व संगोपनाकरिता स्वाधीन केले आहे. परराज्यातून अवैध गोवंश तस्करी करण्यात येत असल्याने पोलिस कारवाईत जप्त केलेला सदर गोवंश संसर्गजन्य लंपी सारख्या आजाराने ग्रस्त असतात आणि त्यामुळे वनव्याप्त क्षेत्रातील वन्य प्राणी सदर गोवंशाच्या सहवासात आल्यास दुर्धर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जप्त केलेल्या गोवंशाच्या माध्यमातून वन्य प्राण्यांना संसर्गजन्य व लंपी आजाराने ग्रस्त होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाखनी व साकोली तालुक्यातील गौशाळा ह्या जंगलव्याप्त परिसरात आहेत. जप्त केलेली गोवंश चराईसाठी जंगल परिसरात सोडली जातात. यामुळे या गोवंशाच्या माध्यमातून लंपी सारखे संसर्गजन्य रोग जंगलातील वन्य प्राण्यांमध्ये होण्याची संभावना वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. पिंपळगाव सडक व बरडकिह्नि गावाला लागून मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे या वनक्षेत्रात हरीण, सांबर, चितळ, नीलगाय, बिबट्या, आस्वल, लांडगे, रान कोंबडे, अशा विविध प्रजातींच्या वन्यजीवांचा सहवास मोठ्या प्रमाणात या परिसरात आहे. ही वन्यजीवे कोका, नागझिरा अभयारण्य कडे सुद्धा विचरण करीत असतात. बरडकिनी हे गाव व तिथे असलेली गौशाळा ही जंगल व्याप्त परिसरात असून तिथेही मोठ्या प्रमाणात पोलिसांनी जप्त केलेला गोवंश स्वाधीन करण्यात आला आहे.

या गौशाळेला गोवंश पालन पोषण व संगोपनाकरिता दानवीरांकडून रोखनिधी व अनेक सेवाभावी संस्था व प्रतिष्ठानकडून चारापाणी व खाद्य सामग्रीची सोय उपलब्ध करण्यात येत असले तरी तेथील गोवंश चराईसाठी जंगलात सोडत असून त्या माध्यमातून वन्य प्राण्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गौशाळांमध्ये मागील दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हजारोच्या संख्येत गोवंश स्वाधीन करण्यात आली होती त्यापैकी शेकडो जनावरे मृत पावले असल्याची गावकºयांमध्ये चर्चा आहे. ती गोवंश कोणत्या आजाराने मेली याची चौकशी झाल्यास मोठा घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोवंश प्रेमींनी मागणी केली आहे की जिल्ह्यातील गौशाळेंमध्ये जमा केलेला गोवंश सुरक्षित आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी प्राणी संरक्षण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालून सत्यता बाहेर काढावी अशी मागणी येथील गोवंश प्रेमींनी केली आहे. तसेच वनाधिकाºयांना शासन गले लठ्ठ वेतन देऊन वन्य जीवांच्या संरक्षणासाठी शासनाकडून कोट्यावधींचा निधी खर्च केल्या जात आहे तर जंगलामध्ये गौ शाळा उघडून त्या माध्यमातून वन्यजीवाला धोका निर्माण होत असल्याने वरिष्ठ पातळीवरून या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यात यावा. लंपी संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येतील वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन वरिष्ठांना माहिती देऊन वनव्याप्त क्षेत्रात असलेल्या गौशाळा अन्यत्र ठिकाणी हलवून वन्यजीवांची काळजी घ्यावी अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *