भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महेंद्र चांदवानी यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमुर्ती पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वोच्च/ न्यायालयाच्या कोलोजीअम मध्ये गेल्या ७ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्यांची हायकोर्टात न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चांदवानी हे मुळचे गोंदियाचे रहिवासी आहेत. वकीलीची ची पदवी घेतल्यानंतर सुरूवातीच्या काळात त्यांनी गोंदिया न्यायालयात प्रॅक्टीस देखील केली होती. ०२ मे २००८ रोजी त्यांची जिल्हा न्यायाधिश पदी नियुक्ती झाली. त्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश म्हणून कार्य केले तसेच ते मुंबई उच्च न्यायालयात महा प्रबंधक म्हणून कार्यरत होते. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठ येथे कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी झालेल्या नियुक्ती बद्दल गोंदिया न्यायालयातील न्यायाधीश व अधिकाºयांनी आनंद व्यक्त केला आहे. अशी माहीती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.