सह आयुक्त श्रीमती माधुरी मडावी यांची साकोली न.प.ला भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : येथील नगर परिषदेतील पूर्व मुख्य कार्यपालन अधिकारी तथा सध्या अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात नगर प्रशासन विभागात सह आयुक्त पदावर कार्यरत श्रीमती माधुरी मडावी यांनी साकोली नगरपरिषद येथे भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त खंदारे उपस्थित होते. यावेळी नगर परिषदेतील कर्मचाºयांशी भेटीदरम्यान अनौपचारिक चर्चा केली. लाखनी व लाखांदूर नगरपंचायतीच्या प्रशासकीय निरीक्षणाकरिता मडावी आल्या होत्या. या याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी स्वप्निल हमाने शुभम दूरुगकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मडावी यांचे स्वागत केले. यावेळी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष जगन उईके, आनंद रंगारी, कैलाश रावूत, सचिन डोमळे, प्रकाश गेडाम,डोमा नीबेंकर , मुकेश बडोले व नगरपरिषदेतील कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.