सिल्ली येथे मुसळधार पावसाने घर कोसळले

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : मागील १५ दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने गुरुवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास भंडारा तालुक्यातील सिल्ली परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवार ते शुक्रवारी सकाळी १० वाजतापर्यंत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे सिल्ली येथील चांगुणा चंद्रहास बागडे या विधवा महिलेचे मातीचे घर आज सकाळी १०.३० वाजता कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घर कोसळले तेव्हा घरात कुणीही नसल्याने सुदैवाने यात कुठलीही प्राणहानी झाली नाही. गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. त्यानंतर रात्री ९ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर संततधार पाऊस पडत राहिला तो शुक्रवारी सकाळी १० वाजतापर्यंत बसरत राहिला. पावसामुळे सिल्ली येथील चांगुणा चंद्रहास बागडे यांच्या घराची भिंत कोसळली, त्यामुळे संपुर्ण घर जमिनदोस्त झाला.

यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त महिला चांगुणा बागडे यांच्यासह गावकºयांनी केली आहे. याप्रकणी गावचे तलाठी यांची ड्युटी निवडणूकीच्या कामासाठी दुसºया गावाला लागल्यामुळे त्या येवू शकल्या नाही. मात्र त्यांनी कोतवाल अतुल चोपकर यांना पाठवून पडलेल्या घरांची फोटो घेतली व तलाठी आल्यावर पंचनामा करतील असे सांगितले. सदर घर जमिनदोस्त झाल्याची माहिती नुकसानग्रस्त विधवा महिलेचा मुलगा निशांत बागडे याने ग्राम पंचायतला व तहसिल कार्यालयाला एका अर्जाद्वारे कळविले आहे. यावर प्रशासन केव्हा चौकशी करते? व केव्हा नुकसान भरपाई देते? याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *