गामपचायत निवडणुकीत जातीय समीकरणाना प्राधान्य !

नाजीम पाशाभाई साकोली : तालुक्यात ग्रामपंचायती निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून चिन्ह वाटप सुद्धा करण्यात आलेले आहेत. या प्रक्रियेनंतर आता गावागावांमध्ये प्रचार युद्ध स्तरावर सुरू झाला आहे. थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने गावामध्ये जातीय समीकरण व ओल्या पार्ट्यांनी वेग घेतला आहे. मात्र गावामध्ये जातीय समीकरणांना प्राधान्य दिल्या जात असल्याने अल्पसंख्यांक मतदार निर्णायक भूमिकेत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात ४१ ग्रामपंचायती मध्ये निवडणुका होत असून २२ सरपंच पद महिलांकरिता आरक्षित असल्याने महिला राज येणार आहे. यामध्ये सरपंच पदाकरिता एकूण १८१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी ३२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आता १४९ उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. या निवडणुकीत तालुक्यातील ६६ हजार ३६१ मतदार मतदानाच्या हक्क बजावणार. ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता ४८ ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आल्याने ७९४ ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता निवडणूक होणार आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत करिता एकूण सदस्य संख्या ३५७ असून या सदस्य पदाकरिता ८९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी ४९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेवश व ४८ ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आल्याने ७९४ उमेदवार ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुकीकरिता रिंगणात आहेत.

ग्रामपंचायतच्या निवडणुकी करिता १३९ मतदान केंद्रावर एकूण ६६ हजार ३६१ मतदार मतदानाच्या हक्क बजावणार आहेत यामध्ये ३३ हजार ९३८ पुरुष तर महिला मतदारांची संख्या ३२ हजार ४२३ इतकी आहे. तालुक्यातील १३९ मतदान केंद्रांवर ६१२ कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येणार आहे तर सुमारे १५० पोलीस कर्मचारी पोलीस बंदोबस्तासाठी लागणार आहेत. मतदान केंद्रावर सरपंच पदाकरिता ईव्हीएम मशीन वर फिका निळ्या रंगाचा निवडणूक चिन्ह राहणार आहे ग्रामपंचायत पंचायत सदस्यांकरिता आरक्षणा नुसार अनुसूचित जातीसाठी फिका गुलाबी, अनुसूचित जमातीसाठी फिका हिरवा, नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवगार्साठी फिका पिवळा, तर सर्वसाधारण गटासाठी पांढºया रंगावर निवडणूक चिन्ह मतदान पत्रिकेवर राहणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश कुंभरे यांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.