स्त्री रोग तज्ञा अभावी रुग्णांची गैरसोय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : आरोग्य सेवा हा हक्क आहे. प्रत्येकाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने आरोग्य विषयक धोरण आखले आहे. मात्र लाखनी तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. येथे रुग्णालय आहे मात्र रुग्णालयात मूलभूत सोई सुविधा नसल्यामुळे आरोग्य सेवा सलाईनवर असल्याचे जाणवते. शासनाच्या वतीने माता – बाल संगोपणावर भर दिला जात असला तरीही स्त्री रोग तज्ञाची नियुक्ती ग्रामीण रुग्णालयात असूनसुद्धा गेल्या दीड वषार्पासून प्रतींनियुक्तीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्य बजावत असल्याने पगार लाखनीतून आणि कर्तव्य भंडाºयात अशी परिस्थिती निर्माण झाली असून प्रतींनियुक्तीवर असलेले स्त्री रोग तज्ञाचे पद तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अद्यावत आरोग्य केंद्राची इमारत, रुग्णवाहिका व निवासी डॉक्टर कर्मचारी ह्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आवश्यकघटक आहेत. परिसरातील ग्रामीण भागातील जनता शासकीय आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत खाजगी रुग्णालय जाणे त्यांच्या खिशाला परवडणा-या सारखे नसते. मात्र पयार्याने खाजगी रुग्णालयात जावून उपचार करावे लागत आहे. तालुक्यात २ ग्रामीण रुग्णालय पाच प्राथमिक आरोग्य केंद्र अलोपॅथिक व आयुर्वेदिक दवाखाने आहेत. परंतु सद्यस्थितीत लाखणी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांना रेफर टु भंडारा चा पाढा लावला जात असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

परिणामी महिला रुग्णांना खाजगी रुग्णालयातजावून उपचार करण्याची वेळ आली आहे. रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नसल्याने प्रसूती साठी वा अन्य बाबींसाठी योग्य उपचार घेता येत नाही या समस्येकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडेच वेळ नाही. त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. परिणामी उत्तम आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जीव मुठीत घेऊन उपचार करावा लागत असल्याची कुजबूज नातेवाईक करीत आहेत. लाखणी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला असून नेहमी किरकोळ व मोठे अपघात होत असतात रुग्णालयात दररोज २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी येत असतात. तर परिसरातिल गर्भवती महिला, तसेच इतर रुग्ण या रुग्णालयात भरती राहत असतात. मात्र रुग्णलयात मानकाप्रमाणे वैद्यकीय अधिकारी नसल्याने योग्य उपचार होत नाही त्यामुळे या समस्येकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *