‘ट्रिपल आर’बनणार गरजूंचा आधार केंद्राचा शुभारंभ

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : केंद्र शासनाच्या ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ अभियानांतर्गत नगर पंचायत मोहाडी येथील सभागृहाच्या बाजूला रिड्यूस, रियूज व रिसायकल अर्थात आरआरआर केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी घरातील निरूपयोगी असलेले साहित्य जुने कपडे, पुस्तके, बॅग, खेळणी, प्लास्टिक आदी वस्तू केंद्रामध्ये जमा करून गरजवंतांना लाभ देण्यास सहकार्य करावे असे आवाहन नगरपंचायतच्या अध्यक्षा छाया डेकाटे यांनी केले. यामुळे गरजूंना खूप मदत होईल. त्याचवेळी, कमीतकमी कचरा बाहेर येईल. ट्रिपल आर ही संकल्पना स्वत:च अद्वितीय आहे. त्यासाठी शहरातील रहिवाशांना पुढे यावेलागेल. मोहाडी शहरातील रहिवाशांना मुलभूत सुविधा देण्यासाठी नगर पंचायत कटिबद्ध आहे.

यासोबतच स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मोहाडी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलण्यात आली असून, यामध्ये ट्रिपल आर केंद्रे प्रभावी ठरणार नगर पंचायत मोहाडी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आरआर- आर केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी बोलण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा छाया डेकाटे, नगरसेविका वंदना कृष्णा पराते, शहर समन्वयक पल्लवी जामोदकार, नगरसेवक लाला तरारे, अवधूत बेंद्रे, मंगेश गभने, तुलाराम कºहाडे, सुनील गायधनी, पांडुरंग कापगते, मार्कंड नंदनवार, दिलिप नंदेश्वर आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *