अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाºयांवर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याकरिता गेलेल्या वन अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमधारकांनी लाठयाकाठया घेऊन कुºहाडीने हल्ला केला. एवढेच नाही तर तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नही केला. अलि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही गंभीर घटना तुमसर तालुक्यातील गोंडीटोला (सुकळी) येथे २४ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे सिहोरा-बपेरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया बपेरा (सि.) वन परीक्षेत्रातील मौजा गोंडीटोला (सुकळी) येथील गट क्रमांक २३ व २६/२ मध्ये १५ ते २० आदिवासी लोकांनी शासकीय जागेवर काही दिवसांपूर्वी अतिक्रमण केले होते. त्यांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही अतिक्रमण सोडले नाही.

याप्रकरणी आतापर्यंत चार वन गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान २४ मार्च रोजी सोंड्या येथील बिटरक्षक डी. ए. कहुलकर, बिटरक्षक ए.जे. वासनिक, डी.जे. उईके, वनरक्षक ए.डी. ठवकर व वन मजूर इमारचंद शिवणे हे वन कर्मचाºयांचे पथक सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान गस्तीवर असताना त्यांना गोंडीटोला (सुकळी) गट क्रमांक २३ व २६/२ मध्ये वीस ते पंचवीस व्यक्ती घटनास्थळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करून धुरे बनवित असताना आढळून आले. बिटरक्षक कहुळकर यांनी अतिक्रमणधारकांना ट्रॅक्टर बाहेर काढण्याकरिता सांगितले असता त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले हे शासकीय वाहनाने कर्मचाºयांना अतिक्रमणस्थळी घेऊन गेले असता जमाव कायमच होता. या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करू नका, असे सांगून त्यांनामज्जाव केला असता वीस ते तीस महिला व पुरुषांच्या जमावाने लाठयाकाठया, पेट्रोलची बाटली घेऊन कुºहाडीने वनकर्मचाºयांवर हल्ला केला. यात पाच वन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

धक्काबुक्की व धमकी

वनपरिक्षेत्र अधिकारी छगन रहांगडाले व बिटरक्षक कहुळकर यांचे कॉलर पकडून जमावाने धक्काबुक्की केली. इतर कर्मचाºयांना तात्काळ निघून जा अन्यथा तुम्हाला कुºहाडीने तोडून टाकू व पेट्रोल टाकून पेटवून देऊ, अशी धमकी दिल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जमावाने एमएच ३६ के १८१ या शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. दगडफेकही केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *