झेंडा लावण्याच्या वादातुन जबर मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सार्वजनिक चौकात सामाजिक झेंडा लावण्यावरून झालेल्या वादात युवकाला गंभीररित्या मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना १९ मार्च रोजी रात्री सव्वा ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मानेगाव/बोरगाव येथे घडली. या घटनेत स्थानिक मानेगाव/बोरगाव निवासी सतीश रंगारी (४२) नामक पीडित युवकाच्या तक्रारीवरून स्थानिक मानेगाव/बोरगाव ग्राम पंचायतचे सरपंच राकेश चुटे (२९), राहुल चुटे (३२) सह बारव्हा निवासी पवन झोडे (३०) नामक आरोपीं विरोधात दिघोरी/मोठी पोलिसात अजैसिट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, स्थानिक मानेगाव/बोरगाव येथील गाडगेबाबा चौक परिसरात मागील काही वषार्पासून लोखंडी खांबाला बौद्ध समाजाचा झेंडा लावला होता मात्र मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामपंचायती अंतर्गत चौकाच्या रुंदीकरणाचे काम सुरु केल्याने बौद्ध समाजाचा झेंडा असलेला खांब काढल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी दुपारी साडे ४ वाजताच्या सुमारास घटनेतील तक्रारदार युवक नव्याने चौकात सामाजिक झेंडा लावण्यास गेला असता काही नागरिकांनी विरोधकेला. यावेळी पीडित युवकाने ग्रामपंचायत सरपंचाला मोबाईल वरून संपर्क साधीत चौक परिसरात सामाजिक झेंडा लावण्यासाठी पुढाकार घेण्यासह परवानगी मागितली मात्र चौक रुंदीकरण अंतर्गत काढलेल्या पूर्वीच्या झेंड्या ऐवजी नव्याने झेंडा लावण्याच्या परवानगी वरून ग्रामपंचायत सरपंच व घटनेतील तक्रारदार युवकात वाद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वादाने संतापलेल्या सरपंचासह घटनेतील अन्य २ आरोपींनी रात्री सव्वा ७ वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच ४९ बी आर ७०१२ ने गावात पोहोचून घटनेतील तक्रारदार युवकाच्या घरी पोहोचले. यावेळी घटनेतील तिन्ही आरोपीतांनी तक्रारदाराला मारण्यासाठी जबरजस्ती घरात प्रवेश करून घरातील उपस्थित महिलांना देखील मारपीट केल्याचा आरोप केला आहे. मात्र घटनेतील तक्रारदार घरात उपस्थित नसल्यानेतिन्ही आरोपींनी तक्रारदाराच्या शोधात स्थानिक ग्रामपंचायत परिसरात पोहोचले. यावेळी स्थानिक ग्रामपंचायत परिसरात उभ्या असलेल्या तक्रारदाराला घटनेतील तिन्ही आरोपीतांनी संगनमत करून जातीवाचक शिवीगाळ करीत गंभीररित्या मारपीट केल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती तक्रारदाराच्या कुटुंबीयांना मिळताच तक्रारदार युवकाच्या पत्नीसह अन्य कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचत मारहाणीत गंभीररीत्या जखमी युवकाला तात्काळ दिघोरी मोठी येथील रुग्णालयात दाखल केले.
दिघोरी मोठी पोलिसांनी जखमीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून तिन्ही आरोपीं विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *