अवैध रेती चोरी प्रकरणी एकास अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अवैधरित्या रेतीची वाहतुक करणा-या आरोपीस पोलिसांच्या पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातुन टॅक्टर व रेती असा ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई आज २४ मार्च रोजी तिरोडा तालुक्यातील परसवाडा ते वैनगंगा नदी पात्राकडे लबडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज शुक्रवारी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना सकाळी ९ वाजता दरम्यान परसवाडा येथे वैनगंगा नदी पात्रातुन अवैरित्या रेतीची वाहतुक करताना ट्रक्टर क्रमांक एचएच ३५ जी ९८२० वर पोलिसांनी कारवाई केली.
याप्रकरणी आरोपी चालक-मालक यशमित चतुर्भुज बिसेन (२८) रा. अजुर्नी ता. तिरोडा याला ताब्यात घेवून ६० रुपये किमतीची रेती व ६ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर हस्तगत केला. पुढील कारवाई दवनिवाडा पोलिस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *