गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: गोंदिया शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आज, सोमवार २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वाटत होती. तसेच हवामान खात्यानेही मेघ गरजांना सह पावसाचा अंदाज वर्तवला होता. अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. ॉ सकाळीच कामावर जाणाºयांकडे छत्री, रेनकोट असे साहित्य नसल्याने अनेकांना पावसात भिजावे लागले. या पावसाचा फटका विक्रेते तसेच व्यापाºयांनाही काही प्रमाणात बसला. शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते. ल-’्रॅँ३ील्ल्रल्लॅ वातावरणातील बदलामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत असतानाच अवकाळी पाऊस पडत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

शासकीय हमीभाव दान खरेदी अंतर्गत खरेदी करण्यात आलेला उघड्यावर असल्याने अवकाळी पावसाचा फटकाही धानाला बसत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी हंगामातील धान कापणी केला असून मांडणीच्या प्रतीक्षेत असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या आठवडाभर उष्णतेच्या पाºयाने उच्चांक गाठला होता. उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, आज, सकाळी पाऊस पडल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *