प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक;२.२९ लाखांचा चुना,दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: राजनांदगावकडून नवेगावबांधकडे जाणाºया वाहनाला पकडून त्या वाहनातून २ लाख २९ हजार रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आला. ही कारवाई नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया कान्होली येथे ३० जानेवारी रोजी करण्यात आली. आरोपी दीपक दिलीप तेजराम कोडापे (३०) याने एम.एच. २७, ए.सी. ३५२४ या वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू तो विक्री करिता राजनांदगावकडून नवेगावबांधकडे आणत असताना कान्होलीजवळ त्याला अन्नसुरक्षा अधिकारी महेश प्रभाकर चहांदे (४३) यांनी ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पकडले. या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप तेजराम कोडापे (४३) व महेश रमेश ठकरांनी, रा. हेमू कॉलनी चौक माता मंदिरजवळ गोंदिया या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुगंधी तंबाखू ईगलचे ३० पोत्यांमध्ये २९९ पॅकेट एक क्विंटल १९ किलो ६०० ग्रॅम किंमत एक लाख ९१ हजार ३६० रुपये, सुगंधित तंबाखू (व्ही वन) ४ पोत्यांमध्ये १९९ पॅकेट ५ किलो ९७० ग्रॅम किंमत ५ हजार ९७० ग्रॅम, राजश्री पान मसाला ४ पोत्यांमध्ये ९९ पॅकेट किंमत ११ हजार व एम. एच. २७, एसी ३५२४ मारुती अल्टो किंमत २० हजार या वाहनात तो तंबाखू ठेवून वाहतूक करीत असताना पकडण्यात आले. आरोपींवर नवेगावबांध पोलिसांत भादंविच्या कलम अन्नसुरक्षा व मानदे कायदा कलम २६) (२) (आय), २६ (२) (आय व्ही), २७ (३) (ई), ३ (१) (झेडझेड) (आयव्ही), ५९ सहकलम १८८, २७२, २७३, ३२८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दुनेदार करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.