शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नोंदणी करा – अपर जिल्हाधिकारी खवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२३ साठी एक आक्टोंबर पासून मतदार नोंदणी प्रक्रीया सुरू झाली असून पात्र शिक्षकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेला फार्म १९ भरून मतदार व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे व नायब तहसीलदार आप्पासाहेब वलखेडे उपस्थित होते. १ आॅक्टोबर २०२२ पासून मतदार नोंदणी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोबतच नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२३ साठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. २५ आॅक्टोबरला दुसरी व अंतीम सूचना प्रसारित झाल्यानंतर ०७ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे. प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबररोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक २५ डिसेंबर २०२२ आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक आॅक्टोबर २०२२ पासून तर ९ डिसेंबर २०२२ पर्यंत दोन टप्प्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. यासाठी निवडणूक विभागाचा नमुना १९ भरणे अनिवार्य आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *