मनरेगा अंतर्गत १ लाख ७८ हजार कुटूंबांना रोजगार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत रुपये २६६५९.६८ लक्ष निधी खर्च झालेले असून त्यामधून ६२.४५ लक्ष मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. या आर्थिक वर्षात १,७८,६६५ कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम, शेळ्यांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, नॉपेड खत, गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी तसेच पाणी टंचाईची समस्या सोड- विण्यासाठी शोष खड्डे इत्यादी कामांचे नियोजन करुन आर्थिक वर्षात लेबर बजेटच्या लक्षांक ६३.५२ लक्ष मनुष्य दिवस नुसार ६२.४५ लक्ष मनुष्य दिवस उद्दिष्टसाध्य केले आहे.

एकंदरीत जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी वर्षात देखील जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कामाचा नियोजन योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये आराखडा तयार करण्यात आलेला मोठ्या प्रमाणात विकासाची कामे उदा. मातीबांध, पांदन रस्ते, सिंचन विहिरी, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, भातखाचर, शौचालय, नाला सरळीकरण, तलावातील गाळ काढणे/तलावाचे खोलीकरण, शेततळे, वनतळी, मैदान सपाटीकरण करणे इत्यादी कामे होत आहेत. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यात ३,३८६ कामे पुर्ण करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामे सुरु करुन जास्तीत जास्त कुटूंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या जिल्ह्यात सेल्फवर ९,७४६ कामे असून यावर्षी सुध्दा लेबर बजेटचे उद्दिष्टप्रमाणे मार्च-२०२४ अखेर पर्यंत १०० टक्के उद्दिष्ट साध्य होईल. असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) लिना फलके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *