गुरुजी वर्गातच दाखवायचे अश्लील चित्रफीत.. तक्रार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : ‘गुरु गोविंद दोनो खडे, किसके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद जिन्हो बताय’ ही संत कबीर महाराजांची दोह्यामधील ओळ गुरूची महिमा दर्शविते परंतु काही शिक्षक आपल्या शिष्यांसोबत अश्लील चाळे करतात. एक दोन नव्हे तर चाळे करून वर्गातच बॅड टच करणाºया शिक्षकांवर रावणवाडी पोलिसात बाललैंगिक अत्याचार अधिनियमन्वये गुन्हा दाखल केला आहे. संजय अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. गोंदिया तालुक्यातील एका तब्बल आठ विद्यार्थ्यांसोबत अश्लील जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिकशाळेत कार्यरत असलेल्या आरोपी शिक्षकाने पाचव्या वर्गातील समोरच्या टेबलवर बसणाºया मुलींना अश्लील चित्रफित दाखविली. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना बॅडटच देखील केले. यासंदर्भात मुलींनी पालकांकडे तक्रार केली.
संबंधित पालकांनी घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील विद्यार्थिनींची तक्रार ताजने यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.