आजपासून पाणी व स्वच्छता कर्मचारी संपावर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अनेक वर्षांपासून आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मानधनात वाढ करण्यात यावी, वैद्यकीय प्रसुती रजा व खर्च तसेच अपघात विमा लागु करण्यात यावा, स्थगिती करण्यात आलेली १० टक्के मानधन वाढ करण्यात यावी, आदी मागण्यांकरीता उद्या मंगळवार पासून आंदोलन करण्यात येत आहे. आज तालुकास्तरावरील गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) मध्ये कार्यरत राहून पाणी व स्वच्छताविषयक काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने मंगळवार (१४ मार्च २०२३) पासून राज्यभर होऊ घातलेल्या आंदोलनाला पाठींबा देऊन महाराष्ट्र राज्य राज्य गट संसाधन केंद्र (पा. व स्व.) कंत्राटी कर्मचारी संघटना भंडारा जिल्ह्याचे वतीने बेमूदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. कामबंद आंदोलनाबाबतचे निवेदन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अरूण गिरीपुंजे यांना देण्यात आले.
तालुकास्तरावरून गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) येथे सन २०११ पासून गट समन्वयक व समुह समन्वयक पदावर कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून पाणी व स्वच्छता विषयक कामे करीत कोणत्याही प्रकारची मानधन वाढ व अन्य सोयीसुविधा देण्यात आलेल्या नाहीत. तोकड्या वेतनावर त्यांना काम करावे लागत आहे. २०१९ मध्ये विविध मागण्यांकरीता राज्यभरातील कंत्राटी कर्मचाºयांनी आपल्या न्यायोचित मागण्यांकरीता कामबंद आंदोलन पुकारले घेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. .
राज्यस्तरावरून प्रलंबित मागण्यांवर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने भंडारा जिल्ह्यात सातही पंचायत समितीस्तरावर कार्यरत गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) मधील सोमवारी सर्व कर्मचाºयांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश तºहेकर, जिल्हा सचिव पल्लवी तिडके यांचे नेतृत्वात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अरूण गिरीपुंजे यांना निवेदन दिले. यावेळी कंत्राटी कर्मचारी नागसेन मेश्राम, त्रिरत्ना उके, निरंजन गणवीर, हर्षाली ढोके, स्मृती सुखदेवे, शशिकांत घोडीचोर, प्रज्ञा देशमुख, प्रशांत मेश्राम, जर्नाधन डोरले, चेतन मेश्राम आदींची उपस्थीती आहेत. आजपर्यंत या कर्मचाºयांना होते. राज्यस्तरावरून आंदोलनाची दखल गट समन्वयक व समन्वयक यांनी कामबंद होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *