हत्तीडोई येथे प्रबोधनातून बहुजन समाज परिवर्तन सोहळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील हत्तीडोई येथील बुध्द विहारात दि. १० मार्च रोजी ‘प्रबोधनातुन बहुजन समाज परिवर्तन सोहळा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा जिल्हा वाहतुक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या हस्ते पुज्य भदंत नागसेन महाथेरो (हत्तीडोई, भंडारा) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणुन पुज्य भदंत धम्मदिप महाथेरो, पुज्य भदंत सुगत महाथेरो, पुज्य भदंत विनय बोधी, पुज्य भदंत आनंदपुज्य, भदंत जीवक, पुज्य भदंत संघानंद, पुज्य भदंत रत्नसार, पुज्य भदंत गयाकश्यप, पुज्य भदंत चारूदत्त, पुज्य भदंत शिलभद्र, पुज्य भादंत कुणालकिर्ती, पुज्य भदंत शिलानंद, पुज्य भदंत मैत्रेय, पुज्य भिक्खुनी धम्मदिना, पुज्य भिक्खुनी खेमा, पुज्य भिक्खुनी धम्मसुमना, पुज्य भिक्खुनी सुबोधी, पुज्य भिक्खुनी विश- ाखा, पुज्य भिक्खुनी सुमेधा आदि भंतेगण उपस्थित होते. तर प्रमुख पाहुण म्हणुन जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये, पं.स.उपसभापती प्रशांत खोब्रागडे, ग्रामसेवक नरेंद्र गजभिये, हत्तीडोई सरंपच सरिता चिंतामन लांजेवार, उपसरपंच अरूण बांडेबुचे, पो.पा. गजानन पडोळे, डॉ.मधुकर रंगारी, डॉ.मंजुषा रंगारी, डॉ.देवेंद्र फुले, डॉ.मृणालीनी फुले, आसित बागडे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी भन्ते गण यांनी उपस्थितांना तथागत गौतम बुध्द यांनी जगाला दिलेल्या बौध्द धर्माविषयी सविस्तर मार्गदर्शन करीत बुध्दाच्या तत्वाचे पालन करीत आपले जिवनमान सुखमय व प्रगतिशिल करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात आरोग्य रोग निदान व मोफत औषध वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन अश्वविर गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील नागरीक, बौध्द उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *