देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे दोन थोर पुरुष आज पुन्हा आले एकत्र!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अहिंसेचा महामंत्र देणारे महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे एकत्र दिसणे व हे दृष्य अनेकांच्या स्वातंत्र्याच्या आठवणी ताज्या करणारेच होते. गांधी चौकातून महात्मा गांधीजी आज शास्त्री चौकात शास्त्रीजींनाच भेटायला आले. रस्त्यावर वर्दळ..पण गाडी चालवणारी वाहतूक, पादचारी, क्षणभर सर्वांचीच पावले थबकली. पुतळ्याच्या रुपात निश्लल उभे असलेले गांधीजी व शास्त्रीजी, गांधीजींच्या अहिंसात्मक व शांततेच्या धोरणांना अनुसरुन त्यांच्या पायाशी नतमस्तक झालेला दहशतवाद, भ्रष्टाचार, प्रांतवाद, हिंसा हे दृष्य लोकांचे लक्ष वेधून घेत होते. अनेक जणं या चालत्या बोलत्या थोरांकडे पाहून विनम्र अभिवादन करत होते. हा क्षण टिपण्यासाठी अनेकांचे कॅमेरे सरसावले.. महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीजींच्या भूमिकेत विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे प्रयोजन लाल बहादूर शास्त्री विद्यालयाने केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.