कृषी महोत्सवात ४७ लाखांची उलाढाल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : रेल्वे मैदान खात रोड येथील पाच दिवसीय कृषी महोत्सवाला यावर्षी उदंड प्रतिसाद मिळाला. या पाच दिवसात ७८ लक्ष रुपयाची उलाढाल झाली असून त्यापैकी ३० लाख रुपयांची शेतकºयांनी विविध कृषी अवजारांची बुकिंग केली आहे तर १७ लक्ष रुपयांची स्टॉलवर उत्पादन विक्री झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. एका अर्थाने जिल्हा कृषी महोत्सव यशस्वी झाल्याची ही पावतीच आहे. आज झालेल्या समारोपात व्यासपीठावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे,कृषी अधीक्षक संगीता माने , सहसंचालक कृषी विभाग मिलिंद शेंडे, संचालक प्रकल्प आत्मा उर्मिला चिखले, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, उपसंचालक आत्मा ,अजय राऊत उपस्थित होते. २६ जानेवारी रोजी पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते या जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. या कृषी महोत्सवात १८५ विविध स्टॉल होते.यामधे यंत्र, निविष्ठा, तंत्रज्ञान,धान्य विक्रीचे,कृषी माल विक्रीचे,माहितीचे स्टॉल,कृषी विज्ञान केंद्राचे स्टॉल,विविध विभागाचे मॉडेल होते. यावेळी पिक स्पर्धा विजेते, तृणधान्य पाककृतीतील विजेत्या महिला, अधिक उत्पादन घेणारे शेतकरी ,तालुक्यातील उत्कृष्ट शेतकरी,अशा एकूण ७८ शेतकºयांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्तावीक आत्मा संचालक उर्मिला चीखले यांनी केले.विभागीय सहसंचालक मिलिंद शेंडे यांनी जिल्ह्यातील कच्च्या मालावर प्रक्रिया करून कच्चामाल करून त्याची विक्री करावी तर शेतकºयांना दीडपट फायदा होऊ शकतो प्रतिपादन केले. शेतकºयांनी प्रक्रिया उद्योग जसे भातावर आधारित मुरमुरे,पोहे निर्मिती केल्यास उत्पादन वाढेल. भंडारा जिल्ह्यात शेतीत यांत्रिकीकरणाचा टक्का वाढला असल्याचे त्यांनी सांगितले . पी .एम .एफ. एम .इ या योजनेत उत्तम काम केल्याबद्दल जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश तइकर यांचाही सत्कार करण्यात आला. शेतकºयांनी या कृषी प्रदर्शनातील माहितीचा वापर करून शेतीत प्रयोग करावे असे,योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. मशरूम,तसेच स्ट्रॉबेरी शेतीसाठी माहिती देण्यात आली .त्याचाही उपयोग करावा,असे आवाहन केले. सूत्र संचालन कृषी अधिकारी योगेश राऊत,तर आभार अजय राऊत यांनी व्यक्त केले .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *