भंडारा जि.प.उपहारगृहाच्या कंत्राट प्रक्रियेत घोळ

भंडारा पत्र्रिका / प्रतिनिधी आहे. भंडारा : भंडारा जिल्हा परिषद परिसरात असलेले उपहारगृह चालविण्या संदर्भात मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातर्पेष्ठ अर्ज मागविण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेत सहभाग न घेतलेल्या संस्थेला कंत्राट देण्यात आल्याने या प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सदर कंत्राट प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भंडारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पवन वंजारी यांनी आज भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेतुन केली भंडारा जिल्हा परिषद परिसरातील उपहारगृह चालविण्यासंदर्भात महिला बचत गट,ग्रामसंघ व प्रभाग संघाकडुन दिनांक ९ मे २०२३ पर्यंत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष भंडारा यांच्या मार्फत सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद भंडारा या नावाने अर्ज मागविण्यात आले होते.त्यासंदर्भात दि.४ मे रोजी एका मराठी दैनिक वृत्तपत्रात जाहिरात सुध्दा प्रकाशित करण्यात आली. सदर जाहिरातीच्या माध्यमातुन दिनांक ४ मे ते ९ मे २०२३ दरम्यानइच्छुक महिला बचत गट,ग्रामसंघ व प्रभाग संघाकडुन अर्ज मागविण्यात आले होते.

दरम्यान दिलेल्या मुदतीमध्ये संबोधी स्वयं सहायता समुह शहापुर (ठाणा) त.जि.भंडारा या महिला बचत गटाचा एकमात्र अर्ज जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आल्याचे माहिती अधिकारात पुढे आले आहे. जिल्हास्तरीय निवड समितीतर्फे कंत्राटाकरीता अर्ज सादर करणाºया संबोधी स्वयं सहायता समुह शहापुर (ठाणा) त.जि.भंडारा यांना अर्ज छाननी व निवड प्रक्रियेकरीता अर्जाच्या मुळदस्तावेजासह दिनांक १२ मे रोजी दुपारी २.३० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांच्या दालनात उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या.मात्र कंत्राटाकरीता अर्ज सादरकरण्याच्या मुदतीत दि.४ मे ते ९ मे २०२३ दरम्यान अर्ज सादर न करणाºया शिखर प्रभागसंघ मुरमाडी (सा.) त.लाखनी जि.भंडारा या प्रभागसंघाला निवड प्रक्रियेत समाविष्ट करून दि.१८ मे २०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा व जिल्हा अभियान प्रकल्प संचालक यांनी संगनमताने नियमांना तिलांजली देत जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेले उपहारगृह चालविण्याचे आदेश निर्गमीत केल्याची बाब माहिती अधिकारातुन पुढे आल्याचे पवन वंजारी यांनी यावेळी सांगीतले.

माहिती अधिकारातुन मिळालेल्या माहितीनुसार सदर उपहारगृहाच्या कंत्राट प्रक्रियेमध्ये मोठया प्रमाणात नियमांची पायमल्ली करण्यात आली असुन यामध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय पवन वंजारी यांनी यावेळी व्यक्तकेला. माहिती अधिकारातुन पुढे आलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असुन उच्चस्तरीय समितीकडुन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व दोषी कर्मचारी/अधिकाºयांवर योग्य कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच शिखर प्रभागसंघ मुरमाडी (सा.)ता. लाखनी जि.भंडारा या प्रभागसंघाला जिल्हा परिषदेतील उपहारगृह चालविण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्य सचिव, ग्रामविकास मंत्रालय मुंबई,भंडारा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना देण्यात आल्याचेही भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी यांनी यावेळी सांगीतले.

पत्रकार परिषदेला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी,काँग्रेसचे जिल्हा सचिव विनित देशपांडे,युवक काँग्रेसचे भंडारा विधानसभा अध्यक्ष आकाश ठवकर आदि उपस्थित होते.

या प्रकरणाशी संबंधीत कुठलीही तक्रार अद्यापपर्यंत माझ्याकडे आलेली नाही. जर कुणाला या प्रक्रियेविषयी शंका-कुशंका असल्यास त्यांनी त्यांचे म्हणने लेखी स्वरूपात सादर करावे.त्या अर्जाच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाईल.

श्री.कुर्तकोटी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *