मोटार पम्प चोरी करणारी टोळी अटकेत!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शेतकºयांच्या इलेक्ट्रिक पाण्याची मोटार पंप चोरी करून शुल्लक भावात विकणाºया चार चोरांना तालुक्यातील आष्टी गावातून गोबरवाही पोलिसांनी अटक करून चोरट्या कडून एक दोन नव्हे तर तब्बल २२ मोटार पंप पोलिसांनी हस्तगत केले. आजवर च्या कारवाही पेक्षा गोबरवाही पोलिसांची ही दमदार कारवाही ठरली आहे. कृषिप्रधान देशातला शेतकरी पूर्वीपासून शेती उत्पन्न घेण्यासाठी संघर्ष करीत आलेला आहे. निसर्गाची साथ, बी बियाणे, शेती औजार यावर शेती उत्पन्न अवलंबून असते. आधुनिक शेतीची कास धरलेल्या शेतकºयांसाठी मोटरपम्प अगदीच जिव्हाळचा विषय, परंतु अवघ्या शिवराला पाणी पाजणाºया मोटरपम्प चोरीचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत. पदरचे पैसे खर्च करून आणलेली मोटरपम्प जेव्हा कुणी चोरून नेते तेव्हाशेतकरी मात्र हवालदिल होतो.. असाच प्रकार पोलीस ठाणे गोबरवाही हद्दीतील परिसरात होत होता.अनेक ठिकाणीमोटरपम्प चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. काही जण पोलीस ठाण्यात तक्रार देत तर काही दुर्लक्ष करीत. पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक पाटील यांनी चोरी करणाºया टोळीचा छडा लावण्याचे ठरविले. पोलीस ठाण्यातील स्टाफ कामाला लागला. गुप्त खबरी जागोजागी पेरले. अनेक दिवसांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले. एका गुप्त खबºया कडून मोटरपम्प विक्री करणाºया टोळीची माहिती मिळाली.

पो स्टे चे पोलीस उपनिरीक्षक करंगामी, पोलिस हवालदार सोळंखी, मनोज साकुरे, पोलीसशिपाई रवी जायभाई, विष्णू जायभाई, नारायण कायंदे यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून इतर तीनआरोपींची नावे उघड झाली. आष्टी गावातील चोरी करणारे चार आरोपी व मोटरपम्प विकत घेणारे दोन आरोपी असे एकूण सहा आरोपी जेरबंद झाले. त्यांच्या कडून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २२ मोटरपम्प जप्त झाल्या. बºयाच दिवसापासून सक्रिय असणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणेदार दीपक पाटील यांना यश आले. त्यांच्या स्टाफने त्यांच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस मेहनत घेतली व शेतकºयांना दिलासा दिला. मोटरपम्प चोरनारी टोळी गजाआड झाल्याने मोटरपम्प चोरीला आळा बसेल. माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पोलीस स्टेशन गोबरवाही येथे भेट देऊन ठाणेदार दीपक पाटील व त्यांच्या स्टाफचे कौतुक केले.अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व पोलीस उपविभागीय अधिकारी रीना जनबंधु यांनीही टीमचे कौतुक केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *