थकबाकीसाठी व्यावसायिक गाळ्याला ठोकले सील

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : वारंवार मागणी करूनही नगर परिषद गाळ्याचे भाडे व मालमत्ता कर थकविणाºया रायबहादूर व्यापारी संकुलातील एका गाळ्याला दि. ९ मार्च ला नगर परिषदेच्या वसुली पथकाने सील ठोकून बाजार वसुली विभागाने दणका दिला आहे. परिणामी नगर परिषदेच्या या कारवाही ने थकबाकीदार चांगलेच धास्तावले आहेत. प्रकाश ब्रम्हानंद सोनकुसरे असे या दुकान गाळ्याच्या भोगवट दाराचे नाव असून यांच्या कडे २०२१-२२ व २०२२-२०२३ ची थकबाकीसह ३८ हजार ४३८ रुपयांचे थकीत होते. गाडा मालकांनी सदर दुकान गणपती इंटरनेट कॅफे यांना दुकान चालविण्याकरिता दिली असल्याची माहिती असून दुकानदाराला थकबाकी किराया मागणी केले असता नेहमीच देण्यास टाळाटाळ करीत होते.
त्यामुळे सदर दुकानाला नगर परिषदेच्या बाजार वसुलीच्या पथकाने नेट कॅफेच्या दुकानातील चालू स्थितीत काम्पुटर, खुर्ची टेबल साहित्यासह पोलीस कर्मचाºयांचे चित्रीकरण करून दुकान सील करण्यात आली. यावेळी नगर परिषद बाजार विभाग प्रमुख देवानंद सावके, कर निरीक्षकप्रवीण बाबर, कृष्णकांत भवसागर, जमील शेख, सुनील मेश्राम, श्यामकला सिंगनजुडे, संजय बडवाईक, शिवचरण पांडे, सहायक फौजदार पोलीस स्टेशन तुमसर चे गजानन वलथरे, शांताराम खावेकर, जितेंद्र दुबे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *