आ. पटोलेंच्या प्रयत्नाने विकास कामांकरिता २७ कोटी २३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली विधानसभा क्षेत्रातील अनेक विकास कामाकरिता मार्च २०२३ अर्थसंकल्पात २७ कोटी २३ लक्ष रुपयांच्या निधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील विकास कामाकरिता सातत्याने पाठपुरावा करून प्रदेशाध्यक्ष व क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी कोट्यावधीचा निधी मंजूर करून घेतला आहे. विधानसभा क्षेत्रातील मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात राज्य व जिल्हा मार्गाच्या रुंदीकरण व सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मागणी केली होती याची दखल घेऊन लाखनी तालुक्यातील अडवाळ पालांदूर दिघोरी रस्ता रामा ३५८ मध्ये सुधारणा करण्यासाठी ५ कोटी २५ लक्ष रुपये, लाखनी तालुक्यातील किटाळी विरली मासळ रस्ता प्र.जि.मा.३९ मध्ये रुदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपये, पोहरा गडपेंढरी धाबेटेकडी बरकिन्ही मिरेगाव रस्ता प्रजिमा २६ मध्ये रुदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ७० लक्ष रुपये, पिंपळगाव आलेसूर मासलमेटा रस्ता प्र.जि.मा.-२५ रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ८ कोटी २० लक्ष रुपये साकोली तालुक्यातील एकोडी जांभळी कोसमतोंडी रस्ता रामा ३५७ मध्ये सुधारणा करण्यासाठी २ कोटी ७६ लक्ष रुपये करण्यात आले आहे. तसेच साकोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाकरिता दोन कोटी २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. असा एकूण २७ कोटी २३ लक्ष रुपयांचा निधी विकास कामाकरिता मंजूर करण्यात आला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विकास कायार्ला प्रारंभ होणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *