महाराष्ट्रातील पहिली एसटीत लेडीज ड्रायव्हर मडेघाटची रुषाली रामटेके

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : समाज कार्य करण्याची आवड व नावीन्य काहीतरी करून दाखविण्याची जिद्द मनात नेहमी होती. तर इतरांपेक्षा वेगळा करण्याची स्वप्न होते. त्यातूनच हातात संसाराच्या स्टेरिंग सांभाळत असतानाच एसटी महामंडळाचे स्टेरिंग हातात घेऊन नव्या आव्हानाला सुरुवात केली अशी आर्यन लेडीज ऋषाली गजभिये (रामटेके) हिने. सदर महिला ही लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथील रहिवासी आहे. पुरुष प्रधान संस्कृतीला मागे टाकत रामटेके कुटुंबातील सून यांनी बहुमान मिळवला आहे. चंद्रपूर येथील रुषाली यशवंत गजभिये वय वर्षे २९ हिने बीएसडब्ल्यू पदवी शिक्षण वडसा येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालय येथे पूर्ण केले. याच दरम्यान २७ मे २०१२ रोजी बौद्ध धर्माच्या रीतीरिवाज प्रमाणे लाखांदूर तालुक्यातील मळेघाट येथील अजय ब्रह्मदास रामटेके माजी पं.स. सदस्य यांच्यासोबत विवाह केला. मात्र रुषाली मध्ये नाविन्यपूर्ण कार्य समाज कार्य करण्याची आवड व इतरांपेक्षा वेगळे करून दाखविण्याची जिद्द असल्याने तिने महिला सक्षमीकरणासाठी यशदा पुणे, युनेशी मुंबई, उमेद अभियान, स्पर्श फाउंडेशन, सत्यमेव जयते मधून वॉटर फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील जळगाव, सातारा, सांगली, वाशिम, धुळे अशा विविध जिल्ह्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिला ट्रेनर म्हणून महिलांना सक्षमीकरणासाठी कार्य केले. तर याच दरम्यान स्पर्धा परीक्षेतून एसटी महामंडळाची चालक पदासाठी २०१९ मध्ये परीक्षा दिली. त्यात ती उत्तीर्ण झाली. मात्र त्याच वेळात कोरोना काळ एसटी महामंडळाचा संप यामुळे एसटीमध्ये २०२३ मध्ये जॉइनिंग झाली. यात चालकासाठी चार चाचण्या पूर्ण कराव्या लागल्या.
महाराष्ट्रातून १५४ मधून दोन महिलांची निवड करण्यात आली. यातील महाराष्ट्रातील पहिली महिला ऋषाली गजभिये (रामटेके) हिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दसºयाला नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व भारिपचे राजरतन आंबेडकर यांच्या हस्ते सुद्धा सत्कार करण्यात आला. एस. टी. मध्ये महिला चालक म्हणून काम करताना संघर्ष तर आहेच. मात्र आनंदही तेवढाच आहे. संसारिक जबाबदारी पार पाडत असताना मुलगी संजीवनी ८ वर्ष मुलगा अन्वय ४ वर्ष आणि पती अजय रामटेके, सासूसासरे, आई-वडील यांच्या सहकार्य मिळत असल्यामुळे एसटीमध्ये नोकरी मिळू शकली. मनात इच्छाशक्ती प्रगल्भ असल्यामुळे व इतरांपेक्षा वेगळे करण्याची आवड असल्याने चालक या पदाकरिता नोकरीची निवड केली आहे, असे तिने यावेळी सांगितले. ही नोकरी करीत असतांना खूप आव्हाने समोर येणार आहेत मात्र त्यात न डगमगता त्याला सामोरे जाणार.
माज्यातून एक महिलांमध्ये आदर्श निर्माण व्हावा. हे उद्देश आहे प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन न मिळाल्याने खूप त्रास सहन करावा लागला. मात्र पती अजय यांनी खंबीर साथ दिली. लहान मुले असल्यामुळे या नोकरीत येण्यासाठी डगमगत होती मात्र दोन्ही कुटुंबांनी साथ देऊन सोबत राहिले. म्हणून आता मी मागे हटणार नाही. आणि भविष्यात स्पर्धा परीक्षा देत राहणार या पेक्षाही अधिक संघर्षाची नोकरी भेटली तरी करणार. आता मी थांबणार नाही. सध्या परिवार हे तालुक्यातील मडेघाट येथे वास्तव्यास असून मुले लहान आहेत. तर नागपूर येथील मध्यवर्ती एस. टी. आगार येथे चालक पदावर सध्या कार्यरत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *