मोहरणा येथे ३५ युवकांनी केले रक्तदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्याने मौजा मोहरणा येथे दि.१६ एप्रिल रोजी मोफत रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे मुख्य आयोजक पंचायत समितीचे सदस्य मंगेश राऊत, ग्रामपंचायत कार्यालय मोहरणा तसेच भवानी क्रीडा मंडळ मोहरणा यांनी संयुक्तरित्या या शिबिराचे आयोजन करण्यात केले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी पोलिस पाटील दादाजी राऊत यांच्या हस्ते सरपंच निलेश बोरकर, यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालय वैद्यकिय अधीक्षक डॉ.दत्तात्रय ठाकरे, प्रसूतीतज्ञ, ग्रामीण रुग्णालय डॉ. रोशनी ठाकरे, नगर पंचायत गटनेते बबलू नागमोती, डॉ.शब्बीर शेख त्वचा रोग, डॉ.तुषार लांजेवार, डॉ.महेश नाकडे, डॉ.बोरकर , भाऊराव राऊत, चिंचोली सरपंच प्रमोद प्रधान, नरेश राऊत, पो.पा. सुभाष राऊत, प्रभाकर चौधरी, स्वप्नील ठेंगरी, मिलिंदरामटेके, माजी सरपंच प्रभाकर मेंढे, परमेश्वर पिल्लेवान, ऋषी राऊत, मधूकर भोयर, मिलींद रामटेके, दादाजी बगमारे, मारोती दिघोरे, अमार्शह माटे, ग्रामपंचायत सदस्य बबुल राऊत, शंकर नागोसे आदी मान्यवर उपस्थित होते.                         सदर आरोग्य शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ८६९ लोकांनी लोक रोग निदान शिबिराच्या लाभ घेतला. यात विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांच्या मार्गदर्शनात विविध आजारांची माहिती व तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांना मोफतऔषधीची वाटप सुद्धा करण्यात आले. उन्हाळ्याचे दिवस असतानाही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात युवकांनी सहभाग दर्शवून रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता सहकार्य केला. आरोग्य विभागाच्या सर्व नर्स, आशा वर्कर तसेच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन शुभम रणदिवे, प्रास्ताविकातून पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी या शिबिरा मागचे उद्देश स्पष्ट करताना या आरोग्य शिबिराचा जनतेने लाभ घेऊन आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भोजराज पिलारे यांनी केले. यावेळी भुराजी देसाई, मारोती दिघोरे, दादाजी बगमारे, प्रशिक ठेंगरी, नितेश नखाते, दिनेश मेश्राम, शुभम रणदिवे, महेंद्र बोरकर, सुधीर नाकतोडे, योगेश देशकर, रोशन नागमोती, कमलेश भागडकर, मयूर बगमारे, राजेश्याम मस्के, सिकंदर मेश्राम, शेखर चौधरी, नितेश हुमने तसेच ग्रामपंचायत मोहरणा व भवानी क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *