युवकाची आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : अंगात कुशल नेतृत्व क्षमता असतानाही केवळ मानसिक तणावातून एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाखांदूर जवळील अंतरगाव येथे ३ आॅक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता दरम्यान घडली. निलेश रामदास सोनटक्के वय २६ रा. अंतरगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. नीलेशच्या घरात आई वडील भाऊ व वहिनी असे मिळून ५ व्यक्ती. दोन्ही भाऊ पेंटिंगचा काम करीत होते. निलेश हा नेहमीप्रमाणे कामावरून आल्यानंतर सायंकाळी जेवण केले. त्यानंतर हनुमान मंदिर येथे आरती व कार्यक्रम बघितल्यानंतर कुणालाही न बोलता एकटा घरी निघून गेला. कार्यक्रम संपल्यानंतर घरातील सर्व जण घरी पोहोचल्यानंतर घराच्या मागच्या बाजूला जांबाच्या झाडाला गळफास लावल्याचा दिसून आला. लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. निलेश याचे मागील तीन वर्षापासून लग्न जुळत नसल्याने मानसिक तनावात असल्याची माहिती आहे. आईला वडील तब्येतीने ग्रस्त असून घरीच बसून राहायचे. आता निलेशच्या रूपाने एक कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतकाच्या परिवाराची मोठी हानी झाली आहे. शांत व सर्वसोबत मिळून मिसळून राहणारा, मदतीला धावून येणारा निलेशने जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. मृतकाचे शव विच्छेदन करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *