आधार वड ‘जीवनाचा’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सामाजिक जिवनात जगत असतांना आपणास मिळणारी माणसे ही समाजातील सर्व सामान्य माणसांचे आदर्श झालेली आपण पाहिली. किंबहूना त्यांना सर्व सामान्यांनी आपले गुरू माणले हे देखील आपल्या निदर्शनास आलेले आहे. परंतु समाजात जन्म घेतल्यावर समाजात आपली पाने-मुळे सामान्य माणसात रूजवणे प्रत्येकाचे काम नाही. त्यात काही अपवाद होतात आणि समाज त्यांना आपला आधार माणतो. त्यातच काही माणसे एक पाऊल पुढे निघतात. त्यांना आपण आधार वड म्हणतो. आधार वड म्हणजे न संपणारा आसरा. एक आधार न संपणारा आधार. जिल्ह्याच्या जन्मभुमीत असाच एक सामान्य माणूस जन्मास आला. वडील अधिक परिश्रमाणे वैद्यकीय आॅफीसर पण सर्व सामान्यांचे आपले डॉक्टर म्हणून प्रसिध्द व्यक्तीत्व अशा प्रसिध्द पण सामान्य कुटूंबात एक बालक जन्मास आला. तारीख होती १९ आॅक्टोंबर १९६६ जन्मास येणाºया बालकाचे नाव ठेवले सुनील. वडील बाबुराव तुमाजी फुंडे व आई इंदुताई बाबुराव फुंडे यांच्या प्रेमळ संसारातील सुनील म्हणजे धाकटे मुलं. आईच्या विशेष प्रेमाणे सुनील मोठा होऊ लागला. सुनीलचा जन्म सरकारी दवाखान्यात झाल्याने आणि वडील स्वत: डॉक्टर असल्यामुळे जन्मापासूनच माझा डॉक्टरी पेशा पुढे सुनील चालवेल अशी अपेक्षा होती. पुढे सुनीलचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले ते जिल्हा परिषद शाळेत चौथी पर्यंत पिंपळगाव या गावी शिक्षण झाले. पुढे सुनील वर्ग ५ ते १२ वी पर्यंत समर्थ विद्यालय लाखनी येथे शिक्षण घेवून समोरचे शिक्षण घेण्यास उमरेडला गेला. अभ्यासात हुशार असलेला सुनील पुढे सिव्हील इंजिनिअर झाला.

आपला अभ्यास आटोपून सुनील गावात परतला. पुढे काय करावे या विषयाने सुनीलला पछाडले. आणि समोरच्या जिवनाचे उद्दीष्ट काय हे ठरवतांना सुनील त्रस्त झाला. म्हणतात ना मुलं मोठे झाले की, आई वडील मुलांना स्वत:च्या पायावर उभे व्हा असे सांगण्याची वेळ सामन्य कुटूंबात निर्माण होते. तशी गरज फुंडे कुटूंबातपण निर्माण झाली.सुनील त्यातच ठेकेदारी व्यवसाय करायचा म्हणून फॉरेस्ट ठेकेदारी तसेच सिव्हील ठेकेदारी करू लागला. आपले स्वत:चे स्थान निर्माण करायचे हेच उद्दीष्ट सुनीलच्या जिवनात प्रथम स्थानावर होते. ठेकेदारी चालू होती, जिवन समोर चालू होते अशातच दुग्ध उत्पादन उत्पादक संघाची निवडणूक लढवावी अशी संधी सुनीलला आली. पण वय होते फक्त २६ वर्ष वयाचे बंधन आड येतात ते जिवनाचे उद्दीष्ट नसलेल्या माणसाचे पण ज्यानी जिवनाचे साफल्य सामान्यांच्या कामांसाठी अर्पण केले आहे त्यांचे कुठे अडत नाही. दुग्ध संघाची निवडणूक लढवणे हे सुनीलला त्याचे समोरचे जिवन बदलवणारे ठरले. दुग्ध संघाची निवडणूक सुनील ने लढवली आणि जिंकले. आता सुनील, सुनीलभाऊ म्हणून समाजात समोर आला. दुग्ध संघात भाऊला त्यांच्या जिवनाचे स्थान बळकट करण्यासाठी भेटले ते स्व. यादवराव पडोळे जे पुढे सुनीलभाऊचे राजकीय गुरू झाले.आपल्या गुरूच्या म्हणजेच स्व. यादवराव पडोळे यांच्या सानीध्यात सुनीलभाऊ घडले. हळूहळू दुग्ध संघाच्या विकासात सुनील भाऊ कर्ते पुरूष म्हणून समोर आले.

स्व. यादोराव पडोळे यांचा संपर्क दांडगा होता. ते स्वत: सक्षम नेतृत्व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मर्जीतले नेते होते. स्व. यादवराप पडोळे यांनी सुनीलभाऊंची संघामध्ये सक्षमता,चातुर्य ओळखले. तसेच आपला राजकीय वारसा सुनीलभाऊ सक्षमतेने चालवू शकेल असा प्रचंड विश्वास ठेवून स्व. यादवराव पडोळे यांनी सुनीलभाऊला काँग्रेस पक्षात ओढले. आणि सुनीलभाऊ खा. प्रफुल्ल पटेल यांच्या सानीध्यात आले. तिथून सुनीलभाऊच्या खºया राजकीय जिवनाची पाया उभारणी झाली. आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. हा राजकीय प्रवास पुढे वाढत गेला तो सामान्य शेतकºयांच्या सानीध्यात. आपला जिल्हा हा खºया अर्थाने शेतकºयांचा जिल्हा आहे हे ओळखून त्यांच्या जिवनात आमुलाग्र बदल घडवून आणले पाहिजे. या आपल्या जिवनमुल्याने सुनीलभाऊंना सामोरे केले. आपल्या जिल्ह्याचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी भंडारा डिस्ट्रीक सेंट्रल को.आॅप. बँक मध्ये प्रवेश केला. आपल्या संपुर्ण सामाजिक बांधीलकीने भाऊ बँकेचे अध्यक्ष झाले. आज जिल्ह्यात शेतकºयांची बँक म्हणून बीडीसीसी बँक नावारूपास आहे ती भाऊंच्या अथक परिश्रमाणे. हक्काची बँक म्हणून शेतकºयांना कर्जा पुरवठा करून बँकेचे नेतृत्व भाऊ सलग १६ वर्ष अध्यक्षपद भुषवीत आहेत. आपल्या जिवनात शेतकºयांची सेवा बँकेच्या रूपात करणाºया भाऊंचा आज वाढदिवस. आपल्या जिवनात सक्षम नेतृत्व आणि विश्वासाला जपणारे भाऊ आपल्या राजकीय जिवनाचे गुरू स्व. यादवराव पडोळे तसेच खा. प्रफुल्लभाई पटेल यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. खा. पटेल जिल्ह्याचे सर्वेसर्वा असून भंडाºयात सुनीलभाऊ आधार स्तंभ आहेत, जिल्ह्याचे आधार वड आहेत. आणि सर्वसामान्यांचे भाऊ आहेत. भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या समोरच्या जिवनाच्या वाटचालीच्यापण शुभेच्छा!

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.