स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आधारित भव्य देखावा!

अ हमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील अशी शिर्डी या गावाची ह्यपोस्टलह्ण ओळख असली, तरी ह्यसाईबाबांची शिर्डीह्ण हीच या गावाची अस्सल ओळख बनली आहे. जिल्हा आणि तालुक्याच्या मदतीने आपली ओळख सांगणाºया इतर चार गावांसारखे हे गाव आज सामान्य राहिलेले नाही. केवळ भारतभरातच नव्हे तर जागतिक स्तरावर या गावाचा लौकिक पोहोचला आहे. साईबाबांच्या प्रभावाने जाती-धर्म आणि प्रांतांच्या सीमा ओलांडल्या आहेत. भारताच्या सर्वदूर भागांतून साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत असतात. त्यामुळे शिर्डीमध्ये साईभक्तांची सतत गजबज असते. सर्वसाधारण आकडेवारीनुसार शिर्डीमध्ये दिवसाला सरासरी पंचवीस हजार भाविक साईबाबांचे दर्शन घेतात. गुरुवार व रविवार हे ह्यसाईबाबांचे वारह्णमानले जातात. या दिवशी शिर्डीमध्ये साईभक्तांची संख्या दुपटीने वाढते. त्याचप्रमाणे, साईबाबा हे अवतारी पुरुष असल्याची श्रद्धा असल्याने रामनवमी, गुरुपौर्णिमा व विजयादशमी या काळात एक-दोन लाख भाविक शिर्डीमध्ये येतात. एकंदरीत, गोळाबेरीज केली तर वर्षाकाठी सुमारे ७० ते ९० लाख भाविक शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतात. भाविकांचा इतका प्रचंड टर्नओव्हर असलेलं शिर्डी हे तसे अगदी अलीकडच्या काळातच तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एक पोरवयाचा फकीर या गावात आला. गावातल्या पडक्या मशिदीत तो राहू लागला.

चार घरी भिक्षा मागू लागला. लोकांनीच त्याला ह्यसाईबाबाह्ण हे नाव दिले. त्याने दिलेल्या जडी-बुटीच्या औषधांनी आजारी लोक बरे होऊ लागले. लोकांनी हा चमत्कार मानला. साईबाबा ह्यचमत्कारीह्ण पुरुष ठरले. साईबाबांचा लौकिक हळूहळू पंचक्रोशीत आणि नंतर महाराष्ट्रभर पसरला. साईबाबांच्या आगमनाआधी शिर्डी हे सुमारे शे-पाचशे वस्तीचे एक सामान्य गाव होते. या गावाच्या जवळपास नदी नसल्याने केवळ पावसावर अवलंबून असलेल्या या गावाच्या नशिबी दुष्काळ पाचवीलाच पुजलेला होता. अशा या फाटक्या गावात साईबाबांचा कृपाआशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तांचे येणे साईबाबा हयात असतानाच सुरू झाले होते. दोन-अडीच दशकांपूर्वी मनोजकुमारने ह्यशिर्डी के साईबाबाह्ण हा हिंदी चित्रपट काढला. या चित्रपटाने साईबाबांची ख्याती भारताच्या कानाकोपºयांत पोहोचवली. त्यानंतर शिर्डीकडे भाविकांचा ओघ वाढला. ह्यसाईबाबा की शिर्डीह्ण ही शिर्डीचीओळख पक्की झाली. महाराष्ट्रातल्या अक्कलकोट, शेगाव या तीर्थक्षेत्रां प्रमाणेच शिर्डीची वाटचाल झाल्याचे दिसते. गावात एका सत्पुरुषाचे आगमन होते त्याच्या वास्तव्याने त्या गावाचा महिमा वाढतो. पाहता पाहता श्रद्धेची एक परंपरा तयार होते. तिचा पद्धतशीर प्रचार-प्रसार होतो.

लक्षावधी लोकांची दर्शनासाठी रीघ लागते. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी व्यवस्था उभ्या राहतात. श्रीमंत-गरीब असे सर्व स्तरांतले लोक आपापल्या कुवतीनुसार दानधर्म करतात.त्यातून देवस्थान श्रीमंत होते. या साºया घडामोडींचा परिणाम गावावर घडतो.सारे गाव कोणत्या ना कोणत्या प्रकारे देवस्थानाशी जोडले जाते. गावाचे अर्थकारण, समाजकारण, राजकारण देवस्थानाशी बांधले जाते. शिर्डीचेही असेच झाले आहे. शिर्डी हे गाव अहमदनगर-मनमाड हमरस्त्यावर आहे. या रस्त्याने अहमदनगरकडून येताना बाभळेश्वर हे चौफुल्याचे गाव ओलांडून काही किलोमीटर पार केले की शिर्डीची चाहूल लागते. या साºया परिसरावर साखर कारखान्यांची कृपा झालेली दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच वाढलेल्या उसाचे फड आणि हिरवीगार शेते डोलत असतात. त्यांच्या साथीने साईभक्तांचे स्वागत करण्यास उत्सुक असलेले शिर्डीमधील तारांकित-बिनतारांकित हॉटेलांचे जाहिरात फलक दिसू लागतात. आपण शिर्डीच्या दिशेने जसजसे पुढे जातो, तसतशी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ढाब्यांची, छोट्या-मोठ्या रेस्टॉरन्ट्सची, लहान लहान टपºयांची संख्या वाढू लागते. मधूनमधून आधुनिक धाटणीची, चेहºयामोहºयाची हॉटेल्स दृष्टीस पडू लागतात. साईकृपा, साईछाया, साईछत्र असे साईचरणी लीन झालेले नामफलक आणि त्यांच्यावरील साईबाबांच्या प्रसन्न मुद्रा आपले लक्ष वेधून घेतात. रस्त्यावरचे मैलाचे दगड शिर्डी अजून काही अंतरावर असल्याचे सांगत असतात; पण भोवतालचा सारा परिसर ह्यसाईमयह्ण झाल्याचे प्रत्ययाला येते. शिर्डीच्या अलीकडे असलेले राहाता हे तालुक्याचे गाव तुलनेने मोठ, परंतु त्याच्या शेजारी असलेल्या साकुरी या छोट्या गावासह ते शिडीर्शी एकरूप झाल्याचे दिसते. राहात्यापासून पुढे ढाब्यांची, लॉजेसची, हॉटेलांची गर्दीच गर्दी दिसू लागते. मोकळ्या जागांमध्ये वाहनतळ थाटलेले दिसतात. अशा वाहनतळांची आणि तिथे पार्क केलेल्या वाहनांची संख्याही नजरेत भरते. जवळपास हेच दृश्य मनमाडच्या बाजूने शिर्डीकडे येताना कोपरगावच्या पुढे काही किलोमीटर अंतर ओलांडल्यानंतर दिसते.

आपल्या भंडारा जिल्ह्यातील भाविक रेल्वेने महाराष्ट्र एक्सप्रेसने गेले तर कोपरगावला उतरतात. शिर्डीच्या भोवती वीस-पंचवीस किलोमीटरच्या परिसरात असलेली अनेक लहान-मोठी गावे अशा प्रकारे ह्यसाईमयह्ण झालेली आहेत. शिर्डीच्या दिशेने जाणाºया सर्व रस्त्यांवर साध्या मोटरसायकलींपासून व्होल्वोसारख्या आलिशान- विशाल आरामगाड्यांपर्यंत वाहनांच्या नंबरप्लेट्सवरून ती वेगवेगळ्या राज्यांमधून येत असल्याचे सहजपणे लक्षात येते. ट्रॅक्स, क्वालिस अशा प्रवासी वाहनांमधून, तसेच उघड्या टेम्पोंमधून जथ्थ्याने येणाºया भाविकांचा ह्यश्री सच्चिदानंद सद्गुरूसाईनाथ महाराज की जयह्ण असा जयघोष वाहनतळ, विविध राष्ट्रीयीकृत, तसेच सहकारी बँका याच रस्त्यावर आहेत. आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अनेक लॉजेस-हॉटेल्स या रस्त्यावर आणि आसपास आहेत. मोजदाद करणे अक्षरश: कठीण जावे इतक्या संख्येने तºहेतºहेची दुकाने या रस्त्यावर, तसेच साईबाबा समाधी मंदिराच्या चारही बाजूंनी पसरलेली आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थांचे-शीतपेयांचे स्टॉल्स, रेस्टॉरन्ट्स, चहा-पानसिगारेट्सच्याटपºया, हार-फूल-पूजासाहित्य-प्रसादांची दुकाने तसेच साईबाबांचे फोटो, प्रतिमा, इमिटेशन ज्वेलरी, गिμट आर्टिकल्स, रुद्राक्षमाळा, आॅडिओ-व्हिडिओसीडीज-कॅसेट्स, साईबाबांवरील विविध भाषांमधली पुस्तके, पोथ्या असा हर प्रकारचा माल विकणारी दुकाने दिसतात. याशिवाय, पथारीवाले-फेरीवाले वेगळेच. शिर्डी गावात तसेच आसपासच्या भागात प्रवासी वाहतूक करणारे टांगेवाले, रिक्ष-ावाले, जीपवाले यांनीही याच रस्त्यावर ठाण मांडलेले दिसते. त्यामुळे या साºया परिसराला एखाद्या जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसते. या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी असते. या गजबजाटातून-वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढत भाविक साईबाबा समाधी मंदिराकडे जात असतात.

श्री साईबाबा समाधी मंदिरावर अलीकडेच चढवण्यात आलेला सोन्याचा कळस आपले लक्ष वेधून घेतो. त्या कळसातून श्री साईबाबा संस्थानची श्रीमंती झळकते. या देवस्थानचा संपूर्ण परिसर या संस्थानच्या अखत्यारीत आहे.एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे कडेकोट तटबंदीमध्ये समाधी मंदिर बंदिस्त आहे. फरक इतकाच,की ही तटबंदी दगड-विटांची नाही तर सुबक-नाजूक कलाकुसरीच्या परंतु मजबूत अशा लोखंडी ग्रिल्सची आहे. या भक्कम तटबंदीमधून मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी चार चिलमी, स्वयंपाकाची भांडी अशा विविध गोष्टींचे जतन या संग्रहालयात करण्यात आलेले आहे. या संग्रहालयालगतच पुस्तकालयाची इमारत आहे. साईबाबा संस्थानच्या प्रकाशन विभागाचे काम इथून चालते. याशिवाय, संस्थानच्या विविध प्रशासकीय इमारती या परिसरात उभारण्यात आल्या आहेत. इथल्या जुन्या-नव्या अशा सर्वच वास्तू देखण्या आहेत. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम साधत या वास्तूंचे सौंदर्य खुलवण्यात आलेले आहे. पारंपरिक दगडी बांधकामाचा बाज इथल्या नव्या वास्तूंमध्येही जपलेला दिसतो. आधुनिक उंची मार्बलचा मुबलक वापर आपलं लक्ष वेधून घेतो. समाधी मंदिर परिसर ऐसपैस आहे.एकूणच या परिसराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुख्य मंदिरासह इतर काही मोठ्या इमारती या परिसरात असूनही सारा परिसर मोकळाढाकळा वाटतो. परिसरात ठिकठिकाणी मन प्रसन्न करणारी लॅन्डस्केपिंग आहेत, छोटी-मोठी कारंजी आहेत. इथला हिरवा तजेला नजरेत भरतो. या साºया परिसरातल्या स्वच्छतेला, टापटिपीला, देखभालीला फुल मार्क द्यायला हवेत. दर्शनरांगेची इमारत पार करून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर पडलेले भाविक या परिसरात एकदम मोकळेढाकळे होतात, निवांत होतात. इथल्या ऐसपैस वातावरणात भाविकांचे थवे ठिकठिकाणी विखुरलेले दिसतात.बहुतेक भाविक सहकुटुंब-मित्र-आप्तेष्टांसह इथे गोळा झालेले दिसतात.

पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

साईनगरीतील साईबाबांच्या शिरडी शतकोत्तरी परंपरा लाभलेल्या पुण्यतिथीला मंगळवार दि. ४ आॅक्टोबर २०२२ पासून सुरुवात झाली आहे. तीन दिवसीय उत्सवासाठी साई संस्थानचा परिसर नटला असून दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. मंगळवारी पहाटे साईबाबांची प्रतिमा, पादुका व ग्रंथ मिरवणुकीने उत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला. सकाळी द्वारकामाईत अखंड साई सच्चरित पारायण सोहळ्यालाही याच वेळी आरंभ झाला. दिवसभर नित्याचे कार्यक्रम होतील. रात्री सव्वानऊ वाजता गावातून बाबांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली, अखंड पारायण सुरू असल्याने उत्सवाच्या पहिल्या दिवशी द्वारकामाई मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. साईच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी दिली. बुधवार दि.५ आॅक्टोबर २०२२ रोजी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. सकाळी ९ वाजता भिक्षा झोळी १० वाजता कीर्तन, १०.३० वाजता आराधना विधी, सायंकाळी निशाण मिरवणूक व सीमोल्लंघन, रात्री ९.१५ वाजता गावातून रथ मिरवणूक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य दिवशी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून श्रींच्या समोर रात्रभर कलाकार हजेरी लावणार आहेत. गुरुवार दि. ६ आॅक्टोबरला सांगता दिनी समाधी मंदिरातील सकाळी पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होईल. सकाळी १० ते १२ समाधी मंदिराच्या व्यासपीठावर काल्याचे कीर्तन होईल. यानंतर साईभक्त बायजाबाई कोते यांच्या वंशजांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होईल. पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिर व मंदिर परिसरात हैद्राबाद येथील साईभक्त ए. महेश रेड्डी यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व सर्वधर्मसमभाव आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आधारित श्री साई दरबार हा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाच्या वतीने साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने मंगलमय हार्दिक शुभेच्छा…!

साईबाबा पुण्यतिथी उत्सव ,यशवंत थोटे मो. ९४२३३८३४५०

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *