दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा!

मोहाडी येथील दसरा म्हटले की त्रिवेणी संगमाचा विजयादशमी उत्सव नक्कीच आठवतो. अस्विन शारदीय नवरात्र उत्सव म्हटले की, मोहाडी येथील श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तीरावरील सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेश्वरी देवीची यात्रा डोळ्यासमोर नक्कीच येते. सन १९९८ पासून मोहाडी येथील गांधी चौकातील विद्यार्थी युवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसाद जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात वाटप करण्यात येत होते. तेही दोन वर्षे कोरोनामुळे बंद पडले होते तर यावर्षीपासून पुर्वरत सुरळीत होत आहे. सार्वजनिक लोकसेवा मंडळ गांधी चौक मोहाडीच्या वतीने श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या पात्रात ५२ फुटचा रावणदहन करण्यात येत होते. तेही यावर्षी परंपरा बंद झाली. या तिन्ही कार्यक्रमाला साठहजार भाविक आवर्जून यायचे. जे यापूर्वी रावणदहन उत्सव समितीचे अध्यक्ष राहिले ते पुन्हा पुढे कधीच पुढे आले नाहीत अर्थात भूमीगतझाले. याचे कारण जे अध्यक्षपदाची जवाबदारी सांभाळले त्याना पोलिसांचा ससेमीरा किती असतो आणि छाती किती धडधड करीत असते त्याना ठाऊकच आहे. मागील तीन वर्षांपूर्वी रावणदहन उत्सव समितीची बैठक सुप्रसिद्ध जागृत माँ चौंडेस्वरीदेवी मंदिरात पार पडली होती. त्यात अध्यक्षपदाची कुणीच जवाबदारी स्वीकाराला तयार नसल्याने स्वत: पुढाकार घेत मोहाडी येथील राजेंद्रनगरातील ४३ वर्षीय अफरोज अनवरखा पठाण या मुस्लिम तरुणाने स्वीकारून इतिहास घडविला आणि भूतो न भविष्यतो प्रमाणे झाले.

यानिमित्ताने का होईना मोहाडी तालुक्यातील १०८ गावातील भाविक सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेश्वरी देवीच्या १ हजार ६०२ विसर्जनसाठी विजयादशमीला यायचे. म्हणून २४ वर्षात त्रिवेणी संगमाचा दसरा जिल्हात प्रसिद्धीच्या झोतात जेमतेम आले होते. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे. पराक्रमाचा आणि पौरूषाचा असा हा सण या दिवशी चार्तुवर्ण सोबत आलेले दिसतात. प्रभु रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढय योध्याचा वध करून शत्रुवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी, देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युध्द करून संपविले ते याच दिवशी. आणि त्यामुळेच तिला महिषासुरमर्दिनी असे म्हंटल्या जाऊ लागले. या आख्यायिकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपुत आणि मराठा योध्दे आपल्या युध्द मोहिमांचा आजच्याच दिवशी शुभारंभ करीत असत. अज्ञानावर ज्ञानाने, वैºयावर प्रेमाने आणि शत्रुवर पराक्रम गाजवित विजय प्राप्त करण्याचा हा दिवसविजयादशमी अतिशय शुभ समजल्या जातो. साडेतिन मुहुर्तांपैकी एक असा हा दिवस कोणत्याही कायार्चा शुभारंभ करण्याकरीता अत्यंत शुभ समजल्या जातो. कित्येक लोक या दिवशी नव्या प्रतिष्ठानांची सुरूवात दसºयापासुन करतात.नवे वाहन या दिवशी घेतल्याजाते. वाहनाची पुजा केली जाते. शस्त्रांची पुजा करण्याचा देखील प्रघात आहे. सरस्वती पुजन या शुभमुहुर्तावर करतात. आपल्या महाराष्ट्रातएकमेकांना सोन्याच्या रूपात आपटयाचे पाने दिली जातात.

या दिवशी सिमोल्लंघन,सरस्वती पुजन, शमीपुजन, शस्त्रांचे पुजन आणि अपराजिता पुजन देखील केले जाते.तिन्ही सांजेला गावाबाहेर जात आपल्या गावाची सीमा ओलांडायची. आपटयाचे आणि शमीचे पुजन करायचे त्या ठिकाणी अष्टदल रेखाटायचे व त्याच्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तीला विजयाकरता वरयुगात पाहिले पाहिजे. हळूहळू पुढच्या टप्प्यावर दिवाळी आहे.दसयापासून अठराव्या दिवशी दिवाळी आहे. हे टाईमटेबल ज्यांनी कुणी ठरवले आहे त्यात बदल होऊ शकलेला नाही. एका सणातून ऊर्जा घेऊन दुस-या सणात पाऊल ठेवताना, त्या सणाचा आनंद पुन्हा सामाजिक स्वरूपात साजरा करण्याची संकल्पना ही विलक्षण मानली पाहिजे. ज्यांनी कुणी या योजना केल्या असतील त्याच्या दूरदृष्टीची आणि समाजदृष्टीची तारीफच केली पाहिजे.असा एक शाश्वत संदेश या सणांमध्ये दिला जातो. तीन वर्षांपूर्वी रामा अर्थात अनिल क्षीरसागर याने मोहाडी चंदूबाबा क्रीडागण समितीच्या माध्यमातून रावणदहन उत्सव साजरा करण्यासाठी अफरोज पठाण या तरुणाशी चर्चा घडवून आणली होती. त्यांनी त्या ग्रुपवर माहिती देण्यात आली होती. हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन मोहाडीची रावणदहन परंपरा सुरू ठेवण्यासाठी एकत्र आले होते. हा सुद्धा या मागचा पूर्वइतिहास आहे. कोरोना असल्याने मोहाडी येथील प्रसिद्धीच्या झोतात रावणदहण उत्सव कोरोनापासून बंद करण्यात आले आणि जे समोर आले आणि कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार घडला की, रावण दहन उत्सव समितीवर पोलीस गुन्हा नोंद करणार.

मोहाडी परिसरात कुठेही घटना घडली हेच जवाबदार यामुळे कुणीच मोहाडीचे नगरसेवक/नगरसेविका पुढे येण्यास तयार नाही. मागील दोनवर्षी कोरोना असल्याने विजयादशमी रावणदहन होणार नसल्याने सांगत होते. वस्तूस्तिथी होतीच यामध्ये काही संशय नाही. आता मोहाडीचा त्रिवेणी संगमाचा दसरा उत्सव फक्त म्हणण्यापुरता राहिला,पण प्रत्यक्षात अंमलात आला नाही. श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या परिसरात सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयानी मोठे मोठे ब्यानर लावले आहेत. रावणपुतळा नाही तर कुंभकर्णचा पुतळा उभा करून करू शकत होते. आज सर्वांनी कच खाल्यानेहिम्मतच हारली. ईतर कामासाठी राजकीय श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधी आरोप आणि प्रत्यारोप करीत असतात. बाहेरगावचा तरुण अजय गायधने मोहाडीत राहायला आला होता आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेत होता. आज मोहाडीत अजय गायधने हयात असता तर नक्कीच त्याने पुढाकार घेऊन लोकवर्गणी करून रावणदहन उत्सव करून मोहाडीची रंगत वाढवली असती.त्याचे मित्र आजही त्याचासारखा कुणीच नाही. आज तो आपल्यामध्ये नाही असता तर रावणदहन उत्सव बंद पडला नसता. पण तो मोहाडीत विविध सामाजिक उपक्रमात आघाडी नक्कीच घेत होता. त्याच्याकामामुळे तो चर्चेत राहायचे.

त्याची आठवण आज यानिमित्ताने का होईना नक्कीच होत आहे.आज विजयादशमीनिमित्ताने रावणाचा फोटो टाकून व्हाटसअप माध्यमातून आपला स्वत:चा फोटो टाकून मी किती मोठा दमदार नेता आणि स्वत:ला सामाजिक नेता समजून शुभेच्छा आज नक्कीच दिसून येतील. पण रावणपुतळा जमत नसेल तर मेघनाथचा पुतळा उभा करून उत्सव साजरा करू शकत होते.पण करायचंच नाहीतर विषय नाही. अजय गायधने गेल्यानंतर आता त्याची जागा कुणीच घेण्यासाठी तयार नाही. सामाजिक नेते आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांची फळी निर्माण नाही. मोहाडी गावची परंपरा लोप पावत आहे. पण कुणालाच चिंता नाही.आजही म्हणतात विजयादशमीला मोहाडीत रावणदहन का बरं नाही तर त्याचे वारसदार कोरोनाच्या लाटेत मृत्यूमुखी पडले. मृत्यू व्हायचा असेल तर सांगून होत नाही. पण मोहाडीतील राजकीय पक्षाचे नेत्याला व कार्यकतेर्ला आपलाचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत आहे. कोरोनाची लागण होऊन मोहाडीतीलच नाही तर अख्या जगभरातील लोक मृत्यूमुखी पडले. मोहाडीच्या रावणदहन उत्सवावर कुणीच बोलायला तयार नाहीत. मोहाडीवासीकरिता मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

अस्विन विजयादशमी उत्सव, यशवंत थोटे मो. ९४२३३८३४५०

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *