शेतकºयांनी पारंपरिक भात शेतीकडून बहुपिक पद्धतीकडे वळावे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप फक्त आध्यत्मिक न ठेवता सामाजिक, कृषी व शैक्षणिक स्तरापर्यंत नेणाºया सार्वजनिक संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळाने “जागर कृषी योजनांचा”या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात आदर्श निर्माण केला. दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने शेतकºयांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहचवून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ निलज बु चे कार्य प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी शारदीय नवरात्रीच्या पावन पार्ववर मोहाडी तालुका कृषी विभाग व सार्वजनिक संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ निलज बु. यांच्या वतीने आयोजित “जागर कृषी योजनांचा” या कार्यक्रम केले. या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. ३ आॅक्टोबर २०२२ रोजला सकाळी ११ वाजता सार्वजनिक संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु.चे अध्यक्ष अमोल बुधे, उपाध्यक्ष अजय गाढवे, सचिव रवींद्र ठवकर, कोषाध्यक्ष मुकेश बडगे, सदस्य चंद्रशेखर डोळस, राकेश कानेटकर, रामेश्वर बोंदरे, निशार ईश्वरकर, मोसम गिरी, विद्यानंद कांबळे, राकेश उरकुडे, मयाराम कांबळे, अरविंद कांबळे, प्रवीण गाढवे, आशिष आंजनकर, आयुष माटे, गौरीशंकर कांबळे, दुर्गेश पाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.या कार्यक्रमांतर्गत गावात कृषी योजनांचा जागर करण्यात आला.यामध्ये उत्पादन तंत्रज्ञानाचे शेतकºयांना माहिती मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकºयांना देण्यात आली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेतकरी मित्रांनो, कमी खर्चात जास्तीत जास्त शेती उत्पादनासाठी यांत्रिकीकरण आवश्यक आहे.

कृषी यांत्रिकीकरण म्हणजे जेथे शक्य असेल तेथे यांत्रिकीकरणाद्वारे प्राणी आणि मानवी शक्तीची पुनर्स्थापनासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना, ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून माध्यमातून शेतकºयांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे, बैल चलित यंत्र, मनुष्य चलित यंत्र,अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्च्यात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र,अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयं चलित यंत्रे इत्यादि गोष्टींवर सरकार कडून अनुदान मिळते. या व्यतिरिक्त महा डीबीटीमार्फत अनेक योजनांचा लाभ घेता येतो, असे मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक जयपाल राऊत यांनी मार्गदर्शन केले. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात तालुका कृषी अधिका- री शिवाजी मिरासे, कृषी पर्यवेक्षक जयपाल राऊत, कृषी सहायक देवेंद्र वाडीभस्मे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघरे, उपसरपंच भाऊराव बुधे, ग्राम पंचायत सदस्य विजय मोटघरे, गौरीशंकर शेंडे, धनवर बडगे, दिनेश बडगे, रामकृष्ण कुकडे, चुन्नीलाल माटे, लिलाधर कांबळे उपस्थित होते. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड १०० टक्के अनुदान, कृषी अभियांत्रिकारण योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य योजना, रोजगार हमी योजनेअंतर्गत भातखचरे पुनरुज्जीवन योजना १०० टक्के अनुदान, रोजगार हमी योजना गांडूळखत योजना १०० टक्के अनुदान, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, मिरची लागवड अनुदान, मल्चिंगसाठी १६ हजार हेक्टरी अनुदान, एकात्मिक फुलत्पादन अभियानांतर्गत ४ लाख अनुदान मिळते, असेही यावेळी कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *