नाकाडोंगरी येथील कोंडवाड्यासमोर घाणीचे साम्राज्य

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : नाकाडोंगरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील बाजूस कोंडवाडा, कांजीहौस व सार्वजनिक मुत्रीघरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे संबंधीत विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय लगतच्या मैदानावर परिसरातील सर्वात मोठा आठवडी बाजार भरतो, मुख्य तुमसर कटंगी अंतरराज्यीय महामार्गवर नाकाडोंगरी हे एक महत्त्वाचे व्यापारी शहर बनले आहे. नाकाडोंगरी येथे काही शासकीय कार्यालये आहेत, तर याच गावात ब्रिटिशकालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. साप्ताहिकाला लागून आरोग्य केंद्र व शैक्षणिक संस्था आहेत. आजूबाजूची सुमारे १५ गावे आणि सीमावर्ती मध्यप्रदेशातील अनेक गावाचे नागरिक नाकाडोंगरी येथे दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा करतात, कांजी हाऊस, मुत्रीघर बांधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निधीतून पैसे खर्च करण्यात आले. परंतु त्याची देखभाल व स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही.
त्यातच कांजीहाऊसचा वापर मुत्रालयासारखा होऊ लागला आहे. कांजीहाऊस आणि मुत्रालयात सगळा कचरा साचू लागल्याने येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. स्वच्छता अभियान संपूर्ण देशात चालवले जात आहे, परंतु नाकाडोंगरी येथे स्वच्छता अभियान राबविले जात नाही असे दिसुन येते. मुख्य रस्त्यावरील ग्रामपंचायतीमध्येही अव्यवस्था आहे. पंचायत समिति, जिल्हा परिषद च्या अधिकाºयांनी लक्ष्य Ñ देण्याची गरज आहे. या समस्येकडे गावातील सौरभ पारधी या तरुण नागरिकाने ग्रामपंचायतीला निवेदन देऊन लक्ष वेधले असून योग्य व्यवस्था बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *