विश्व हिंदू परिषद मातृशक्ती विदर्भप्रांत संयोजिका कांचन ठाकरे यांचा सत्कार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे निमित्त साधून बालाजी नगर मंदिर खात रोड जिल्हा भंडारा येथे महिलाद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात बालाजीनगर निवासी ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत खोकरला सरपंच वैशाली सार्वे तसेच खोकरला ग्रामपंचायत महिला सदस्य मंगला क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम दि.८मार्च २०२३ घेण्यात आला. सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याबद्दल विश्व हिंदू परिषद मातृशक्ती विदर्भ प्रांत संयोजिका कांचन ठाकरेयांचा सत्कार करण्यात आला. तसेच लघूउद्योजिका म्हणून सविता रोकडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या रमा गजभिये, माधूरी शेन्डे, निता ढोबळे, रंजना गायधने उपस्थित होत्या. रॅम्प वॉक, संगीत खुर्ची गीत भजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. पाहुण्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करीता बालाजी नगर समिती अध्यक्षा तृप्ती पोरशेट्टीवार, सूजाता चचाने, सीमा नखाते, माया बघेले, अपर्णा लोहकरे संध्या खडसकर, माधूरी भगत, निता रोकडे, लिला लिलारे, प्रिंयका शिंगाडे, ममता घारगडे, ममता जांभूळकर, माधूरी भगत, वाडीभस्मे यांचे सहकार्य लाभले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन रजनी तरोणे बालाजी नगर समिती सचिव यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *