जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी मोहाडी : जलजीवन मिशन योजना अंतर्गत ४ कोटी ६४ लाख ४६ हजार रुपए निधि मंजूर करुन रविवार दि.१९ मार्च २०२३ ला सकाळी १० वाजता इंदिरा आवास शास्त्री वार्ड वरठी येथे पाण्याची टाकी बांधकाम सत्तर हजार लिटर क्षमता पाईप लाईन जोड़णी नळ कनेक्शन जोड़णी पंपिंग मशीन दुरुस्ती व इत्यादि कामाचे भूमिपूजन सोहळा घेण्यात आला. आयोजित कार्यक्रमाचे उद्धघाटक तुमसर-मोहाड़ी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु मानिकराव कारेमोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार मधुकर कुकडे हे होते.सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छशाल देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख अतिथी समाजसेविका रंजीता राजू कारेमोरे, सभापती रितेश भाऊराव वासनिक, अनिल काळे, सरपंच श्वेता अरविंद येळणे, उपसरपंच सुमित पाटिल, माजी सरपंच संजय मिरासे, अरविंद येळणे, उमेश भोंगाड़े, पवन रामटेके, योगेश हटवार, चेतन डांगरे, चेतन ठाकुर, अतुल भोवते, विशाल शेंडे, रुपेश गाढ़वे, दिलीप गजभिये, कैलाश तीतीरमारे, रवि बोरकर, राजू सिंग, राजू केवट, हेमंत मलेवार, दिनेश कुकडे, राकेश कारेमोरे, निखिल मोहतुरे, अमित सुखदेवे, शीरीश शहारे, अमोल बंसोड, सचिन गोस्वामी, रामसिंग बैस, रंजीत बागड़े, प्रणय मेश्राम, रामलाल बोन्दरे, सुभाष मते, शारदा सिंग, ललिता बावणे, आकांक्षा वासनिक, बुद्धकला फुले उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *